एक्स्प्लोर

Dipali Sayyed : तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल

Dipali Sayyed On Rupali Chakankar : या चित्रपटाला विरोध करताय म्हणजे तुम्ही जे केलं आहे ते खरं आहे का, असा प्रश्न पडतोय, अशा शब्दात दिपाली सय्यद यांनी रुपाली चाकणकरांना प्रत्युत्तर दिलं आहे. 

मुंबई : आगामी 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' (Maharashtra Epstein Files) या चित्रपटावर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी 25 कोटी रुपयांचा दावा दाखल केल्यानंतर अभिनेत्री दिपाली सय्यद (Dipali Sayyed) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. हा चित्रपट कोणत्याही व्यक्तिरेखेवर आधारित नाही. महिलांना फसवून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या भोंदूगिरीविरोधात जनजागृती करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं दिपाली सय्यद यांनी म्हटलं. तुम्ही जर हे केलं नाही तर का झोंबतंय? असा सवालही त्यांनी केला. 

Maharashtra Epstein Files : काय आहे प्रकरण?

नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरात  प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसला होता. सध्या अशोक खरात प्रकरणावर आधारित  'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'  या सिनेमाची प्रचंड चर्चा होत आहे. या सिनेमाचा टीझर रिलीज झाला असून, या टीझरमधून अभिनेत्री दिपाली सय्यद यांची पहिली झलक पाहायला मिळतीय.

दिपाली सय्यद यांनी साकारलेले पात्र रुपाली चाकणकर यांच्याशी साधर्म्य असल्याची चर्चा रंगू लागली. त्यावर रुपाली चाकणकर यांनी कायदेशीर कारवाईचा मार्ग स्वीकारला आहे. त्यांनी सिनेमाचे दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेत्री दिपाली सय्यद यांना नोटीस पाठवली आहे. चाकणकरांनी त्यांच्यावर 25 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा केला आहे.

Dipali Sayyed Vs Rupali Chakankar : दिपाली सय्यद यांचं उत्तर

या सगळ्यावर आता दिपाली सय्यद यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, "आमच्यावर 25 कोटींचा दावा करण्यात आला आहे आणि ज्या व्यक्तीने हा दावा दाखल केला आहे त्याच्यावर हसू येतं. कारण हा चित्रपट कोणत्याही व्यक्तीच्या जीवनावर आधारीत नाही, आत्मचरित्र नाही, किंवा त्यामध्ये कोणत्याही व्यक्तीच्या नावाचा वापर करण्यात आला नाही. 

हा चित्रपट केवळ आणि केवळ महाराष्ट्रात सुरू असलेल्या भोंदुगिरीवर आधारित आहे. त्या भोंदुगिरीला कित्येक महिला बळी पडल्या असून त्यांचं जीवन उद्ध्वस्त झालं आहे. त्यांना कुठेतरी या गोष्टीचं ज्ञात व्हावं, त्यावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न आहे, असं दिपाली सय्यद म्हणाल्या. एक कलाकार म्हणून मला माहिती आहे की या चित्रपटात कोणत्याही व्यक्तिरेखेचा वापर किंवा त्याच्या नावाचा वापर करण्यात आला नाही. महाराष्ट्रात जे घडलं गेलं आहे, ते सत्य दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे, असा दावाही त्यांनी केला. 

Maharashtra Epstein Files : तुम्हाला का झोंबतंय? 

रुपाली चाकणकरांना उत्तर देताना दिपाली सय्यद म्हणाल्या की, "हा चित्रपट करत असताना तुम्ही आमच्यावर 25 कोटींचा दावा दाखल करत असाल तर कुठेतरी चुकतंय. हा चित्रपट न करू देण्यामागे तुम्ही जे केलं आहे ते खरं आहे का? असा प्रश्न पडतोय. तुम्ही असं करायला नको होतं. तुम्हाला हे झोंबतंय का? "

महिलांवर होणारे अत्याचार कुठेतरी थांबले पाहिजेत. एक कलाकार म्हणून आम्ही सत्य परिस्थिती समोर आणण्याचा प्रयत्न करतोय. जे काही असेल त्या गोष्टीला आम्ही कोर्टात उत्तर देऊ, अशी भूमिकाही दिपाली सय्यद यांनी मांडली. 

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Epstein Files Movie Teaser: अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
Deepika padukone Spirit: 10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
Aavarapan Atul Parchure: तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
IND vs SL 2nd Test : कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Nashik Crime News: चार वर्षांपासून प्रेमसंबंध; नंतर लग्नाला दिला नकार, दोघांचं पुन्हा लग्न जुळवण्यासाठी भोंदूनं दाखवलं अमिष, स्मशानात रात्री पूजा अन्..., हजारो रूपये उकळले
चार वर्षांपासून प्रेमसंबंध; नंतर लग्नाला दिला नकार, दोघांचं पुन्हा लग्न जुळवण्यासाठी भोंदूनं दाखवलं अमिष, स्मशानात रात्री पूजा अन्..., हजारो रूपये उकळले
Share Market News : शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
Aus vs Ban 2nd Test Mitchell Starc : मैदानात आले, मिनिटांत पुन्हा गेले... मिचेल स्टार्कने फलंदाजांचं कंबरडं मोडलं, 12 धावांवर बांगलादेशचा अर्धा संघ आऊट, नेमकं काय घडलं?
मैदानात आले, मिनिटांत पुन्हा गेले... मिचेल स्टार्कने फलंदाजांचं कंबरडं मोडलं, 12 धावांवर बांगलादेशचा अर्धा संघ आऊट, नेमकं काय घडलं?
Ind vs Sl 2nd Test : पहिल्या कसोटीत पराभव होताच श्रीलंकेने 3 जणांना बाहेर काढलं, टीम इंडियाविरुद्ध आता जाहीर केला नवा Squad, चक्रावून टाकणाऱ्या खेळाडूंची एन्ट्री
पहिल्या कसोटीत पराभव होताच श्रीलंकेने 3 जणांना बाहेर काढलं, टीम इंडियाविरुद्ध आता जाहीर केला नवा Squad, चक्रावून टाकणाऱ्या खेळाडूंची एन्ट्री
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Harshwardhan Sapkal: राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमाआधीच पुण्यात मोठा राडा; हर्षवर्धन सपकाळ भडकले, म्हणाले, 'भाडोत्री गुंडांचा हा स्टंट; कार्यक्रम तर होणारच'
राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमाआधीच पुण्यात मोठा राडा; हर्षवर्धन सपकाळ भडकले, म्हणाले, 'भाडोत्री गुंडांचा हा स्टंट; कार्यक्रम तर होणारच'
Embed widget