एक्स्प्लोर

Deepika padukone Spirit: 10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप

चित्रपटाच्या एकूण बजेटचा विचार करता या आर्थिक अटी निर्मात्यांना मान्य नव्हत्या, असा त्यांचा दावा आहे.

Deepika padukone: प्रभासच्या बहुचर्चित ‘स्पिरिट’ या चित्रपटातून अभिनेत्री दीपिका पादुकोण बाहेर पडल्यानंतर सुरू झालेला वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याआधी दीपिकाने दिवसाला केवळ 8 तास काम करण्याची अट ठेवल्यामुळे तिने चित्रपट सोडल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, आता चित्रपटाचे निर्माते प्रणय रेड्डी वांगा यांनी या प्रकरणाबाबत काही नवे दावे केले आहेत.

दीपिकाने प्रॉफिटमध्ये 10 टक्के हिस्सा मागितला?

दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांचे भाऊ आणि ‘स्पिरिट’चे निर्माते प्रणय रेड्डी वांगा यांनी एका मुलाखतीत दीपिकासोबत जवळपास दीड वर्ष चर्चा सुरू असल्याचं सांगितलं. संदीप रेड्डी वांगा यांना दीपिकाला या चित्रपटात घेण्याची इच्छा होती. मात्र, अखेरीस दोन्ही बाजूंमध्ये काही अटींवर एकमत होऊ शकलं नाही.

प्रणय यांच्या दाव्यानुसार, दीपिकाने केवळ अभिनयाच्या मानधनावर चर्चा न करता चित्रपटाच्या नफ्यातून 10 टक्के हिस्सा मागितला होता. त्याशिवाय मानधन आणि शूटिंगच्या वेळेबाबतही काही मुद्द्यांवर मतभेद होते.

प्रणय रेड्डी वांगा यांनी सांगितलं की, हा प्रश्न केवळ दीपिकाच्या फीमध्ये 5 ते 6 कोटी रुपये वाढ करण्यापुरता मर्यादित नव्हता. चित्रपटाच्या एकूण बजेटचा विचार करता या आर्थिक अटी निर्मात्यांना मान्य नव्हत्या, असा त्यांचा दावा आहे.

‘कथेची माहिती लीक झाल्याचा’ आरोप

या प्रकरणात आणखी एक गंभीर आरोप करण्यात आला आहे. प्रणय रेड्डी वांगा यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा निर्मात्यांनी या भूमिकेसाठी दुसऱ्या अभिनेत्रीचा विचार करण्यास सुरुवात केली, तेव्हा ‘स्पिरिट’ची कथा आणि दीपिकाच्या व्यक्तिरेखेशी संबंधित काही माहिती बाहेर येऊ लागली.

निर्मात्यांचा आरोप आहे की, दीपिकासोबत कथेची आणि तिच्या भूमिकेची माहिती शेअर करण्यात आली होती. ही अंतर्गत माहिती सार्वजनिक होऊ नये, अशी अपेक्षा होती. मात्र, ती माहिती लीक झाल्याचा दावा प्रणय यांनी केला आहे. मात्र, या आरोपांवर दीपिका पादुकोणकडून अद्याप कोणती प्रतिक्रिया आलेली नाही.

‘स्पिरिट’मध्ये कोण दिसणार?

‘स्पिरिट’चं दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा करत आहेत. या चित्रपटात प्रभास मुख्य भूमिकेत दिसणार आहे. विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या देसाई यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.हा चित्रपट आठ भाषांमध्ये प्रदर्शित करण्याची योजना असून, सध्या ‘स्पिरिट’ 5 मार्च 2027 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

MLA Anant Singh: आमदाराच्या लेकीच्या लग्नात राडा; जेवणावरुन भांडण, ताटं हिसकावल्याचा प्रकार, प्रसिद्ध अभिनेता संतापला
आमदाराच्या लेकीच्या लग्नात राडा; जेवणावरुन भांडण, ताटं हिसकावल्याचा प्रकार, प्रसिद्ध अभिनेता संतापला
Jai Jai Swami Samarth: एका बाजूला संसार, तर दुसऱ्या बाजूला स्वामीभक्ती! रुहीसमोर मोठं संकट, स्वामी कसा दाखवणार मार्ग?
एका बाजूला संसार, तर दुसऱ्या बाजूला स्वामीभक्ती! रुहीसमोर मोठं संकट, स्वामी कसा दाखवणार मार्ग?
Vivek Oberoi Salman Khan: सलमान-विवेकमधील जुना वाद संपला? अभिनेत्याने भाईजानच्या सिनेमाचं केलं कौतुक, म्हणाला 'हा' सिनेमा नक्की पाहा
सलमान-विवेकमधील जुना वाद संपला? अभिनेत्याने भाईजानच्या सिनेमाचं केलं कौतुक, म्हणाला 'हा' सिनेमा नक्की पाहा
Kiran Karmarkar: 'लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ यांनी पण नोकरांची भूमिका... मराठीत हिरो पण हिंदीत लहान भूमिका साकारण्याबद्दल प्रसिद्ध अभिनेत्याचं स्पष्ट मत
'लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ यांनी पण नोकरांची भूमिका... मराठीत हिरो पण हिंदीत लहान भूमिका साकारण्याबद्दल प्रसिद्ध अभिनेत्याचं स्पष्ट मत

व्हिडीओ

Majha Katta Sanjay Mone Ashok Mulye : ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये, अभिनेता संजय मोने माझा कट्ट्यावर
Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delimitation bill Shivsena: भाजपने डिलिमिटेशनसाठी खासदारांची जुळवाजुळव केली, पण उद्धव ठाकरेंची एक खेळी सगळं गणित बिघडवणार? सहा फुटीर खासदारांनाही व्हीप बजावला, उल्लंघन केल्यास...
भाजपने डिलिमिटेशनसाठी खासदारांची जुळवाजुळव केली, पण उद्धव ठाकरेंची एक खेळी सगळं गणित बिघडवणार? सहा फुटीर खासदारांनाही व्हीप बजावला, उल्लंघन केल्यास...
Raj Thackeray : होकायंत्र दिशा दाखवतं, पण हे धोकायंत्र; राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका, डिलिमिटेशनवरून म्हणाले, 'काय दिवे लावतायेत ते अजून खासदार वाढवावे वाटतायेत...'
होकायंत्र दिशा दाखवतं, पण हे धोकायंत्र; राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका, डिलिमिटेशनवरून म्हणाले, 'काय दिवे लावतायेत ते अजून खासदार वाढवावे वाटतायेत...'
Vijay Wadettiwar on Sharad Pawar: शरद पवारांनी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर मी त्यांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागेन: विजय वडेट्टीवार
शरद पवारांनी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर मी त्यांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागेन: विजय वडेट्टीवार
Sonia Gandhi DMK Stalin: मोठी बातमी: सोनिया गांधी मैदानात उतरल्या, स्टॅलिनना भेटण्यासाठी विमानाने चेन्नईला निघाल्या, अमित शाहांनी जुळवलेलं डिलिमिटेशनचं गणित बिघडणार?
मोठी बातमी: सोनिया गांधी मैदानात उतरल्या, स्टॅलिनना भेटण्यासाठी विमानाने चेन्नईला निघाल्या, अमित शाहांनी जुळवलेलं डिलिमिटेशनचं गणित बिघडणार?
Jalgaon DCC Bank Election : 21 पैकी 12 जागा बिनविरोध; जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला, भाजप विरोधात शिवसेना मैदानात, घडामोडींना वेग
21 पैकी 12 जागा बिनविरोध; जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला, भाजप विरोधात शिवसेना मैदानात, घडामोडींना वेग
Sanjay Raut: शरद पवार, सुप्रिया सुळेंनी अचानक संविधानाविरोधी भूमिका का घेतली? संजय राऊतांनी सांगितला एक महिन्यापूर्वीचा संविधान रॅलीतील किस्सा
शरद पवार, सुप्रिया सुळेंनी अचानक संविधानाविरोधी भूमिका का घेतली? संजय राऊतांनी सांगितला एक महिन्यापूर्वीचा संविधान रॅलीतील किस्सा
Delimitation Bill NCP: डिलिमिटेशनसाठी बहुमताची 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी हालचाली; संसदेत महत्त्वाचा बदल, पवारांच्या पक्षाचा पाठिंबा पण दोन खासदार राहणार अनुपस्थित, नेमकं कारण काय?
डिलिमिटेशनसाठी बहुमताची 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी हालचाली; संसदेत महत्त्वाचा बदल, पवारांच्या पक्षाचा पाठिंबा पण दोन खासदार राहणार अनुपस्थित, नेमकं कारण काय?
Prithviraj Chavan and Sharad Pawar NCP: शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यक्रम होणार होता, पृथ्वीराज चव्हाणांना भाजपच्या गोटातून माहिती मिळाली, किती खासदार फुटणार होते?
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यक्रम होणार होता, पृथ्वीराज चव्हाणांना भाजपच्या गोटातून माहिती मिळाली, किती खासदार फुटणार होते?
Embed widget