एक्स्प्लोर

Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती

Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पुण्यात होणाऱ्या 'छात्रों की गूंज' या कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात आली आहे.

Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: लोकसभेतील (Lok Sabha) विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या उपस्थितीत पुण्यात (Pune) होणाऱ्या 'छात्रों की गूंज' (Chhatron Ki Goonj) या कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. काँग्रेसच्या या देशव्यापी अभियानाचा चौथा टप्पा पुण्यात पार पडत असून, या कार्यक्रमात राहुल गांधी प्रामुख्याने विद्यार्थिनी आणि तरुणींशी थेट संवाद साधणार आहेत. शिक्षण (Education), वाढती बेरोजगारी (Unemployment) आणि महिला सुरक्षा (Women Security) या महत्त्वाच्या मुद्द्यांवर ते सविस्तर चर्चा करणार आहेत.

पुण्यातील आरटीओ (RTO) जवळील 'एआयएसएसएमएस' शैक्षणिक संस्थेच्या मैदानावर सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी तब्बल 42 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याने कार्यक्रमस्थळी प्रचंड गर्दी होण्याचा अंदाज आहे. ही गर्दी आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती विचारात घेऊन पुणे पोलिसांकडून (Pune Police) कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Rahul Gandhi Chhatron Ki Goonj:  कसा असेल पोलिसांचा बंदोबस्त?

कार्यक्रमादरम्यान सुरक्षितता राखण्यासाठी आणि गर्दीचे योग्य नियोजन करण्यासाठी पोलिसांचे दोन टप्प्यांत विशेष नियोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमस्थळी सुमारे 500 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा कडक बंदोबस्त असेल. मुख्य प्रवेशद्वार, वाहनतळ, प्रमुख चौक आणि संपूर्ण परिसरावर पोलीस यंत्रणा बारीक लक्ष ठेवून असणार आहे. तसेच प्रवेश करणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाणार आहे.

कार्यक्रमामुळे परिसरातील वाहतुकीवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तब्बल 700 वाहतूक पोलिसांचा (Traffic Police) ताफा स्वतंत्रपणे तैनात करण्यात आला आहे. वाहनांची कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांनी विशेष वाहतूक आराखडा तयार केला आहे. गर्दी प्रचंड वाढल्यास वाहतुकीचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी मार्ग वापरण्याचे नियोजनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे. विशाल जनसमुदाय आणि विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद पाहता, काँग्रेस पक्षाकडून या कार्यक्रमाची जय्यत तयारी झाली असून संपूर्ण परिसराला छावणीचे रूप आले आहे. 

Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: लाईव्ह कॉन्सर्ट अन् राहुल गांधींचा थेट संवाद

या कार्यक्रमाचे स्वरूप अत्यंत भव्य आणि युवावर्गाला आकर्षित करणारे ठेवण्यात आले आहे. सध्या स्टेजवर साऊंड टेस्टिंग आणि बँड सेटिंगचे काम वेगाने सुरू आहे. सायंकाळी 5 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल. सुरुवातीला बॉलीवूड प्लेबॅक सिंगर असिस कौर यांचा लाईव्ह कॉन्सर्ट रंगणार आहे. त्यानंतर हिपहॉप आर्टिस्ट सायना यांचा परफॉर्मन्स आणि 'टीम डान्सेक्स'च्या कलाकारांचे खास सादरीकरण होईल.

सांस्कृतिक कार्यक्रमांनंतर ठीक 6 वाजता राहुल गांधींचे भाषण सुरू होईल. या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे व्यासपीठावर राहुल गांधी यांच्या व्यतिरिक्त एकही नेता उपस्थित असणार नाही. भाषणानंतर राहुल गांधी उपस्थित विद्यार्थ्यांसोबत थेट प्रश्नोत्तरे करून त्यांच्याशी सविस्तर संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमात राहुल गांधी विद्यार्थ्यांशी काय संवाद साधणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

आणखी वाचा 

Harshwardhan Sapkal: राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमाआधीच पुण्यात मोठा राडा; हर्षवर्धन सपकाळ भडकले, म्हणाले, 'भाडोत्री गुंडांचा हा स्टंट; कार्यक्रम तर होणारच'

शिवानी पांढरे
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अनुकूल वातावरण असतानाही असा निकाल कसा आला? मोकाट सुटलेल्यांना लवकरच आळा बसेल, जयकुमार गोरेंचा रोख नेमका कुणाकडं?
अनुकूल वातावरण असतानाही असा निकाल कसा आला? मोकाट सुटलेल्यांना लवकरच आळा बसेल, जयकुमार गोरेंचा रोख नेमका कुणाकडं?
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Winner Candidate List: विधान परिषदेच्या 5 पैकी 3 जागांचा निकाल जाहीर; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
विधान परिषदेच्या 5 पैकी 3 जागांचा निकाल जाहीर; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
अजित पवार विमान अपघात प्रकरण! सत्य समोर येईपर्यंत पाठपुरावा सुरुच राहणार, जय पवारांनी घेतली CID अधिकाऱ्यांची भेट, नेमकी काय झाली चर्चा? 
अजित पवार विमान अपघात प्रकरण! सत्य समोर येईपर्यंत पाठपुरावा सुरुच राहणार, जय पवारांनी घेतली CID अधिकाऱ्यांची भेट, नेमकी काय झाली चर्चा? 
Advertisement

व्हिडीओ

Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
Narendra Modi Tweet: विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
Chhatrapati Sambhajinagar Graduates Constituency Result 2026 मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
Praful Patel NCP : 'आजचा विधानपरिषदेचा निकाल सांगतोय, आपल्याला पक्षात सुधारणा करावी लागेल'; प्रफुल पटेलांचा राष्ट्रवादीला घरचा आहेर, नेमकं काय म्हणाले?
'आजचा विधानपरिषदेचा निकाल सांगतोय, आपल्याला पक्षात सुधारणा करावी लागेल'; प्रफुल पटेलांचा राष्ट्रवादीला घरचा आहेर, नेमकं काय म्हणाले?
Embed widget