एक्स्प्लोर

Sher Shivraj : 'शेर शिवराज' मध्ये दिसणार प्रतापगडाची पराक्रमी गाथा! शिवराज अष्टकातील चौथे पुष्प ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार!

Sher Shivraj Release Date : ‘पावनखिंड’ चित्रपटाच्या जबरदस्त यशानंतर 'शेर शिवराज' चित्रपटाचं काम अंतिम टप्प्यात असून, येत्या 22 एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Sher Shivraj Release Date : आजवर शिवचरित्र अभ्यासकांनी, इतिहासकारांनी आपापल्या परीनं शिवचरित्राचं यथार्थ वर्णन केलं आहे. अनेकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पोवाडेही अभिमानानं गायले आहेत. शिवचरित्रातील ‘अफझलखान वध’ या शिवकालीन इतिहासाचा महत्त्वाचा अध्याय आहे. ज्यामुळं खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्याची प्रतिष्ठापना झाली, असं आपण म्हणू शकतो. आता हाच ऐतिहासिक सुवर्णअध्याय 22 एप्रिलला रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज होत आहे. नुकतेच ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj) या चित्रपटाचे आकर्षक पोस्टर आणि पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

त्या काळी विजापूरच्या दरबारात 'मै लाऊंगा शिवाजी को...! जिंदा या मुर्दा!', अशी वल्गना करत अफझलखानाने शिवरायांना जिवंत वा मृत घेऊन येण्याचा विडा उचलला होता. निर्माते नितीन केणी, प्रद्योत प्रशांत पेंढरकर, अनिल नारायणराव वरखडे आणि चिन्मय मांडलेकर यांच्या साथीनं लेखक, दिग्दर्शक, निर्माता दिग्पाल लांजेकर यांनी अफझलखान वधाचा चित्तथरारक अनुभव 'शेर शिवराज' या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर आणण्याचा विडा उचलला आहे. ‘पावनखिंड’ चित्रपटाच्या जबरदस्त यशानंतर 'शेर शिवराज' चित्रपटाचं काम अंतिम टप्प्यात असून, येत्या 22 एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘शिवराज अष्टका’तील चौथे पुष्प

‘शिवराज अष्टक’ या संकल्पनेअंतर्गत 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त' आणि 'पावनखिंड' या चित्रपटांचं यशस्वी दिग्दर्शन करणाऱ्या दिग्पाल लांजेकर यांच्या 'शेर शिवराज' चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध कसा केला? हे पहायला मिळणार आहे. प्रतापगड आणि अफझलखान यांचा खूप जवळचा संबंध आहे. राजांना जेरबंद करण्याच्या उद्देशानं भला मोठा फौजफाटा घेऊन सर्व तयारीनिशी खान प्रतापगडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचला खरा, पण पुन्हा माघारी जाऊ शकला नाही. तिथेच त्याची कबर खोदली गेली. कारण खानाला शिवरायांच्या युद्धनीतीची, बुद्धीचातुर्याची, गनिमी काव्याची यासोबतच संयम, शिष्टाई आणि चतुराई या गुणांची जराही कल्पना नव्हती.

शिवरायांच्या याच अद्भुत गुणांचं आणि अनोख्या युद्ध कौशल्याचं दर्शन 'शेर शिवराज' या चित्रपटात घडणार आहे. यासोबतच त्या काळातील सामाजिक, राजकीय वातावरण, राजांच्या अचूक निर्णयांचा रयतेला होणारा फायदा, शत्रूंची आक्रमणं परतवून लावण्याची शक्ती, अफझलखानाची स्वारी, खानाचा वध करत विजापूरी साम्राज्याला राजांनी लावलेला सुरुंग आणि त्यामुळं हादरलेल्या आदिलशाहीचं यथोचित चित्रण 'शेर शिवराज' मध्ये दिग्पालनं केलं आहे. याची झलक नुकत्याच रिलीज करण्यात आलेल्या 'शेर शिवराज'च्या पोस्टर व टीझरवर ही पहायला मिळते.

पाहा टीझर :

प्रतापगडावर डौलानं फडकणारा हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा, महाराजांचा रक्तानं माखलेला हात, खानाचा कोथळा काढणारी वाघनखं आणि त्या काळापासून आजच्या युगापर्यंत घडणाऱ्या सर्व घटनांचा मूक साक्षीदार असणाऱ्या तळपत्या सूर्याचं दर्शन पोस्टरवर घडतं आणि टीझरमधूनही तो थरार आपल्याला पहायला मिळतोय.

'शेर शिवराज' सारख्या चित्रपटांची आजच्या पिढीला गरज!

'शेर शिवराज' चित्रपटाची निर्मिती मुंबई मुवी स्डुडिओजचे नितीन केणी, राजवारसा प्रोडक्शनचे प्रद्योत पेंढरकर व अनिल नारायणराव वरखडे, तसेच मुळाक्षरचे दिग्पाल लांजेकर व चिन्मय मांडलेकर यांनी केली आहे. याविषयी बोलताना मुंबई मुवी स्टुडियोजचे निर्माते नितीन केणी सांगतात, ‘गेली 2 वर्ष चित्रपटगृहांपासून प्रेक्षक दूर राहिलाय व त्यानंतर आलेल्या ‘पावनखिंड’ चित्रपटाला प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला आणि आता 22 एप्रिलला प्रदर्शित होणारा 'शेर शिवराज' हा चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी होईल, यात आम्हाला शंका वाटत नाही’. राजवारसा प्रोडक्शनचे प्रद्योत पेंढरकर म्हणाले, ‘आजची पिढी डिजिटल आहे. इतिहासाच्या अभ्यासासाठी संदर्भ ग्रंथ, बखरी, पुस्तके यांची नितांत आवश्यकता आहेच पण त्याची आवड निर्माण होण्यासाठी चित्रपटाइतके दुसरे प्रभावी माध्यम नाही त्यामुळे 'शेर शिवराज' सारख्या चित्रपटांची आजच्या पिढीला गरज आहे.’

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 05 July 2024PM Modi meet Team India:मातीची चव कशी होती?कॅच कसा घेतलास?मोदींची प्रत्येक खेळाडूशी चर्चा UncutCNG Bike | जगातली पहिली CNG बाईक पाहिलीत का? 330 किलीमीटरचं मिळतोय मायलेज!Top 25 : राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 05 July 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
Embed widget