एक्स्प्लोर

अखेर, 'धुरंधर'ला टक्कर देणारी फिल्म आलीच; ओपनिंग डेलाच कमावले 500 कोटी, फक्त देशातच नाहीतर जगभरात डंका

या चित्रपटात उत्तम सीन्ससह, VFX चा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे चित्रपटाचा प्रत्येक सीन धमाकेदार बनलाय. या चित्रपटाच्या ट्रेलरवरूनही याच्या सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा अंदाज येईल.

Avatar Fire and Ash Collection: बॉक्स ऑफिसवर सध्या ‘धुरंधर’चं (Dhurandhar) वर्चस्व पाहायला मिळत आहे. 15 दिवसांत या चित्रपटाचा वर्ल्डवाइड कलेक्शन 700 कोटींवर पोहोचला असून लवकरच  देशांतर्गत 500 कोटींचा टप्पाही पार होण्याची शक्यता आहे. मात्र, 19 डिसेंबर रोजी रिलीज झालेल्या एका नव्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसची समीकरणं बदलली आहेत. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरात 500 कोटींची कमाई करत भारतात 20 कोटींचा आकडा गाठला आहे. हा चित्रपट म्हणजे जेम्स कॅमरून यांची बहुप्रतिक्षित हॉलीवूड फ्रँचाइज- ‘अवतार: फायर अँड एश’(Avatar Fire and Ash). ‘धुरंधर’चा जोरदार गाजावाजा सुरू असतानाही हॉलीवूडची ‘अवतार: फायर अँड एश’ बॉक्स ऑफिसवर थेट भिडली आहे. भारतात या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 20 कोटींचा टप्पा पार केला आहे.

जेम्सच्या चित्रपटाचा पहिला भाग 'अवतार' आणि दुसरा भाग 'अवतार: द वे ऑफ वॉटर' म्हणून प्रदर्शित झाला. आता, त्याच्या तिसऱ्या भागाचं नाव 'अवतार: फायर अँड अॅश' असं आहे. तिसऱ्या सिक्वेलमध्ये पाहण्यासारखं बरंच काही आहे. उत्तम सीन्ससह, VFX चा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे चित्रपटाचा प्रत्येक सीन धमाकेदार बनतो. 'अवतार'चा ट्रेलर म्हणजे, सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा उत्तम नमुनाय. प्रत्येक सीनपासून ते अगदी बारीक-सारीक डिटेल्सपर्यंत सगळं काही धमाकेदार आहे. 

बॉक्स ऑफिसवर धुरंधरला टक्कर 

जेम्स कॅमरूनची ‘अवतार’ फ्रँचाइज 19 डिसेंबर 2025 रोजी वर्ल्डवाइड रिलीज झाली. बॉक्स ऑफिस ट्रॅकर सॅकनिल्कनुसार, भारतात या चित्रपटाने ओपनिंग डे ला 20 कोटींचा गल्ला जमवला, तर जागतिक स्तरावर कमाई 500 कोटींवर पोहोचली. याचदरम्यान ‘धुरंधर’ने 15व्या दिवशी 22 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे ‘धुरंधर’च्या गोंगाटातही ‘अवतार: फायर अँड एश’ने बॉक्स ऑफिसवर यशस्वी एंट्री घेतली आहे.

‘अवतार: फायर अँड एश’ भारतात इंग्लिश, हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा सहा भाषांमध्ये रिलीज झाला आहे. पहिल्याच दिवशी इंग्लिश आवृत्तीतून 9 कोटी, हिंदीतून 5.5 कोटींची कमाई झाली. तेलुगूमध्ये 2.85 कोटी, तमिळमध्ये 2.6 कोटी, कन्नडमध्ये 8 लाख तर मल्याळममध्ये 2 लाखांची कमाई चित्रपटाने केली आहे. विशेष म्हणजे, ‘अवतार: फायर अँड एश’ची ओपनिंग ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’पेक्षा कमी आहे. 2022 मध्ये रिलीज झालेल्या ‘द वे ऑफ वॉटर’ने भारतात 40.3 कोटींची ओपनिंग केली होती आणि पहिल्याच वीकेंडला 128.8 कोटींचा गल्ला जमवला होता. आता ‘धुरंधर’च्या जोरदार कमाईदरम्यान ‘अवतार: फायर अँड एश’ हे आकडे पार करू शकते का, हे पाहणं औतुक्याचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Bandla Ganesh Daughter Wedding: लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
Marathi Psycho Thriller Movie: सुखी संसार, अचानक विचित्र वागणारी पत्नी अन् एका अनोळखी महिलेचं अस्तित्व; OTT वरचा हा क्लासिक सायकॉलॉजिकल थ्रिलर चुकवू नका
सुखी संसार, अचानक विचित्र वागणारी पत्नी अन् एका अनोळखी महिलेचं अस्तित्व; OTT वरचा हा क्लासिक सायकॉलॉजिकल थ्रिलर चुकवू नका
Govinda and Sunita Ahuja: '3 महिन्याच्या लेकीचा मृत्यू, प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच मला...'; पूर्ण खचलेला गोविंदा, पत्नीसह नर्मदेच्या काठी गेला अन्...
'3 महिन्याच्या लेकीचा मृत्यू, प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच मला...'; पूर्ण खचलेला गोविंदा, पत्नीसह नर्मदेच्या काठी गेला अन्...

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Embed widget