धर्मेंद्र आणि डिंपल कपाडियाचा 'तो' किसिंग सीन पाहाण्यासाठी थिएटरमध्ये तोबा गर्दी व्हायची, बॉलिवूूड कलाकारांच्याही भूवया उंचावलेल्या
Dharmendra and Dimple Kapadia kissing scene : धर्मेंद्र आणि डिंपल कमाडियाचा 'तो' किसिंग सीन पाहाण्यासाठी थिएटरमध्ये तोबा गर्दी व्हायची, बॉलिवूूड कलाकारांच्याही भूवया उंचावलेल्या

Dharmendra and Dimple Kapadia kissing scene : अभिनेत्री डिंपल कपाडिया हिने सुपरस्टार राजेश खन्ना यांच्याशी लग्न केल्यानंतर सुमारे 12 वर्षे चित्रपटसृष्टीपासून दूर राहणे पसंत केले. मात्र, जेव्हा तिने पुनरागमन केलं तेव्हा तिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. डिंपल कपाडियाने सनी देओलचे वडील धर्मेंद्र यांच्यासोबतही डिंपलने काही चित्रपट केले. धर्मेंद्रसोबतच्या एका चित्रपटातील किसिंग सीन खूप चर्चेत राहिला होता. (Dharmendra and Dimple Kapadia kissing scene)
1992 साली ‘दुश्मन देवता’ नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात धर्मेंद्र आणि डिंपल कपाडिया मुख्य भूमिकेत होते. चित्रपट फारसा चालला नाही, पण त्यातील एक सीन खूप काळ चर्चेचा विषय ठरला. या चित्रपटातील एका सीनमध्ये धर्मेंद्र आणि डिंपल कपाडिया एकमेकांना किस करताना दाखवले गेले होते. डिंपल वयाने धर्मेंद्रपेक्षा 21 वर्षांनी लहान आहेत. दोघांचा हा किसिंग सीन खूप गाजला.
सनी देओल अन् डिंपलच्या अफेअरची चर्चा
या सीनची विशेष चर्चा होण्याचं कारण असं होतं की त्याच काळात डिंपल आणि सनी देओल यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या होत्या. दोघांच्या अफेअरच्या बातम्या त्या काळात माध्यमांमध्ये जोरदार झळकत होत्या. लोकांना विश्वासच बसत नव्हता की धर्मेंद्र आपल्या मुलाच्या गर्लफ्रेंडसोबत अशा प्रकारचा सीन करू शकतात!
डिंपल कपाडिया सनी देओलचे एकत्रित अनेक सिनेमे
काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असंही नमूद करण्यात आलं की डिंपल कपाडिया यांना धर्मेंद्रसोबत किसिंग सीन करायचा आहे, याची पूर्वकल्पना नव्हती. डिंपलच्या म्हणण्यानुसार, त्या सीनच्या शूटिंगनंतर खूपच नाराज झाल्या होत्या आणि त्यांनी डबिंग करण्यास नकार दिला होता. डिंपल कपाडियाने सनी देओलसोबतही अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. काही चित्रपटांमध्ये त्यांनी सनीसोबत बोल्ड सीनही दिले. आजही ते दोघे चांगले मित्र आहेत.
2017 साली जेव्हा डिंपल कपाडिया आणि सनी देओल यांचा एक व्हिडीओ लंडनहून व्हायरल झाला, तेव्हा पुन्हा एकदा त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. विशेष म्हणजे धर्मेंद्र यांनीही तो व्हिडीओ ट्विटरवर लाईक केला होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या
'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम का सोडला? निलेश साबळेंनी सांगितलं कारण; भाऊ कदम यांचाही तोच मुद्दा























