एक्स्प्लोर

Box Office collection: 'धमाल 4'च्या कमाईला मोठा ब्रेक! सहाव्या दिवशी 31.6% घसरण; 'अल्फा'च्या गटांगळ्या, 'वेलकम टू द जंगल'चीही दमछाक

'धमाल 4', 'अल्फा', 'वेलकम टू द जंगल' आणि 'मैं वापस आऊंगा' यांच्या कमाईवर येत्या दिवसांत त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Box Office Collection: या आठवड्यातला  बुधवार बॉक्स ऑफिसवर बॉलीवूड चित्रपटांसाठी (Box Office Collection) धक्कादायक ठरला. सध्या चित्रपटगृहांमध्ये 'धमाल 4', 'अल्फा', 'वेलकम टू द जंगल' आणि 'मैं वापस आऊंगा' हे चित्रपट प्रदर्शित आहेत. मात्र बुधवारी या चारही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर गटांगळ्याच खाल्याचं चित्र होतं. कोणाच्या कमाईत 31 टक्के, तर कोणाच्या कमाईत 33 टक्क्यांपर्यंत घट झाली. तरीही 'धमाल 4'ने (Dhamal 4) 100 कोटींचा टप्पा पार करत दमदार कामगिरी कायम ठेवली आहे.

Dhamaal 4: ab'धमाल 4'च्या कमाईत 31.6 टक्क्यांची घसरण

'धमाल 4'ने प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी 6.50 कोटी रुपयांची कमाई केली. पाचव्या दिवशी चित्रपटाने 9.50 कोटी रुपये कमावले होते. त्यामुळे एका दिवसात 31.6 टक्क्यांची घसरण झाली आहे.आतापर्यंत चित्रपटाने भारतात 89.75 कोटी रुपयांचं नेट आणि 107.11 कोटी रुपयांचं ग्रॉस कलेक्शन केलं आहे. चित्रपटाचं बजेट सुमारे 150 ते 200 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.परदेशात सहाव्या दिवशी चित्रपटाने 1.25 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे ओव्हरसीज कलेक्शन 17.25 कोटी रुपये, तर एकूण वर्ल्डवाइड कलेक्शन 124.36 कोटी रुपये इतकं झालं आहे.

Alpha Box Office:'अल्फा'चा खेळ जवळपास संपला?

आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'अल्फा'ची अवस्था दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे. प्रदर्शनाच्या 11व्या दिवसापासून चित्रपटाची कमाई लाखांच्या घरात आली आहे.आतापर्यंत 'अल्फा'ने भारतात 55.80 कोटी रुपयांचं नेट आणि 66.48 कोटी रुपयांचं ग्रॉस कलेक्शन केलं आहे. तर जगभरातील एकूण कमाई 93.48 कोटी रुपये झाली आहे.YRF स्पाय युनिव्हर्समधील हा महिला-केंद्रित अॅक्शनपट अपेक्षित यश मिळवण्यात अपयशी ठरत असल्याचं चित्र दिसत आहे.

Welocome To Jungle Box Office:'वेलकम टू द जंगल'चीही दमछाक 

अक्षय कुमारचा मल्टिस्टारर 'वेलकम टू द जंगल' प्रदर्शनाच्या 20व्या दिवशी पोहोचला आहे. चित्रपटाने आपलं बजेट वसूल केलं असलं, तरी सुपरहिटचा दर्जा मिळवू शकलेला नाही.20व्या दिवशी चित्रपटाने 50 लाख रुपयांची कमाई केली. 19व्या दिवसाच्या तुलनेत ही 33.3 टक्के घसरण आहे.आतापर्यंत चित्रपटाने भारतात 131.35 कोटी रुपयांचं नेट आणि 156.07 कोटी रुपयांचं ग्रॉस कलेक्शन केलं आहे. तर वर्ल्डवाइड कलेक्शन 189.32 कोटी रुपये इतकं झालं आहे.

Main Vaapas Aaunga:'मैं वापस आऊंगा' ठरला हिट

इम्तियाज अली दिग्दर्शित 'मैं वापस आऊंगा' या चित्रपटालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दिलजीत दोसांझ, नसीरुद्दीन शाह, शर्वरी वाघ आणि वेदांग रैना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने सुरुवातीला संथ गतीने कमाई केली, मात्र सकारात्मक प्रतिसादामुळे नंतर जोरदार मुसंडी मारली. आतापर्यंत चित्रपटाने भारतात 62.82 कोटी रुपयांचं नेट आणि 74.70 कोटी रुपयांचं ग्रॉस कलेक्शन केलं आहे. तर जगभरातील कमाई 95.65 कोटी रुपये झाली आहे.

'द ओडिसी'मुळे वाढणार अडचणी

या चारही चित्रपटांसमोर आता सर्वात मोठं आव्हान म्हणजे ख्रिस्तोफर नोलन यांचा 'द ओडिसी' हा बहुप्रतिक्षित हॉलिवूड चित्रपट. 17 जुलै रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. त्यामुळे 'धमाल 4', 'अल्फा', 'वेलकम टू द जंगल' आणि 'मैं वापस आऊंगा' यांच्या कमाईवर येत्या दिवसांत त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Detective on Actress: 'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
Upcoming Movies Box Office: 14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?
14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?
Toxic Yash Animal Scene: यशने रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’मधील 'तो' सीन केला कॉपी? ‘टॉक्सिक’मधील न्यूड लूकवर होतंय ट्रोलिंग
यशने रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’मधील 'तो' सीन केला कॉपी? ‘टॉक्सिक’मधील न्यूड लूकवर होतंय ट्रोलिंग
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
Embed widget