एक्स्प्लोर

Madhuri Pawar | 'देवमाणूस'ची चंदा झळकणार 'दिशाभूल'मध्ये, माधुरी पवारची मराठी चित्रपटात वर्णी!

Madhuri Pawar : ‘दिशाभूल’ या चित्रपटात माधुरी पवार बरोबर ‘मिसेस मुख्यमंत्री’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अमृता धोंगडे आणि अभिनेता तेजस बर्वे ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे.

Madhuri Pawar : 'देवमाणूस', 'तुझ्यात जीव रंगला' या टीव्ही मालिका आणि सोशल मिडियावरील आपल्या व्हिडिओ मुळे चर्चेत असणारी अभिनेत्री, नृत्यांगना माधुरी पवार (Madhuri Pawar) आगामी 'दिशाभूल' या मराठी चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत  दिसणार आहे. सानवी प्रॉडक्शन हाऊसची पहिली निर्मिती असलेल्या 'दिशाभूल' या मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पुण्यात संपन्न झाला.

आरती चव्हाण यांची निर्मिती आणि आशिष कैलास जैन दिग्दर्शित ‘दिशाभूल’ या चित्रपटात माधुरी पवार बरोबर ‘मिसेस मुख्यमंत्री’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अमृता धोंगडे आणि अभिनेता तेजस बर्वे ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. तसेच या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते शशांक शेंडे,  प्रणव रावराणे, अरुण कदम, सिद्धेश्वर झाडबुके, आशुतोष वाडेकर, शुभम मांढरे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे अशी तगडी स्टारकास्ट असून तेजससह मुख्य भूमिकेतील दूसरा अभिनेता कोण? याची उत्कंठा आता अधिकच वाढली आहे. 

हा तर तरुणाईचा चित्रपट!

दिग्दर्शक आशिष कैलास जैन म्हणाले की, ‘दिशाभूल’ हा आजच्या तरुणाईचा चित्रपट आहे. कॉलेजमधील मुलांची ही अनोखी कथा असून यामध्ये फ्रेंडशिप, रोमान्स आणि सस्पेन्स थ्रीलर असा ट्रिपल धमाका असणार आहे.’

चित्रपटाबद्दल बोलताना निर्मात्या आरती चव्हाण म्हणाल्या, ‘दिशाभूल’ हा सानवी प्रॉडक्शन हाऊसचा पहिला चित्रपट आहे. तरुण कलाकारांना संधी देतानाच दिग्गज कलाकारांना आम्ही सोबत घेतले आहे. 'दिशाभूल' मधून आम्ही करत असलेला वेगळा प्रयोग प्रेक्षकांना भावेल असा विश्वास वाटतो.

माझ्यासाठी भूमिका नवीन!

आपल्या भूमिकेबद्दल सांगताना माधुरी म्हणाली, 'दिशाभूल' हा एक वेगळ्या धाटणीची कथा असलेलला चित्रपट आहे. यातील माझी व्यक्तीरेखा ही मी आज पर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा अतिशय वेगळी आहे. चित्रपटाचे शुटींग सुरू झालं असून नवीन टीम सोबत काम करताना मजा येत आहे.’

सानवी प्रॉडक्शन हाऊसच्या "दिशाभूल" चित्रपटाचा मुहूर्त निलेशजी राठोड (गृहमंत्रालय, नवी दिल्ली), रुकिया कडावत (राठोड) (बांधकाम व्यावसायिक), दशरथ गायकवाड (विस्तार अधिकारी) यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी दिग्दर्शक आशिष कैलास जैन, डीओपी वीरधवल पाटील, संगीतकार क्रिस मस्करेन्हस,  प्रथमेश धोंगडे, विनोद नाईक, ऍड. प्रज्ञावंत गायकवाड, गोपाळ कडावत, योगेश गोल्हार आदी मान्यवर उपस्थित होते.  

महत्वाच्या बातम्या

Pawankhind Movie : दिग्पाल लांजेकरांच्या 'पावनखिंड' सिनेमाचा मुहूर्त अखेर ठरला, 18 फेब्रुवारीला चित्रपटगृहात होणार प्रदर्शित

अभिनेता धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांचा घटस्फोट; 18 वर्षांच्या सुखी संसारानंतर झाले विभक्त

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Thriller Movie: जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
Salman Khans SVC63: राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
Mallika Sherawat: 21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
Rajkummar Raos Prahaar: कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget