एक्स्प्लोर

Deool Band 2 Teaser Out: स्वामींच्या साक्षीने अक्कलकोटमध्ये ‘देऊळ बंद 2’चा टीझर रिलीज; कार्यक्रमात स्नेहल तरडेंना अश्रू अनावर, म्हणाल्या..

यानंतर प्रवीण तरडेची पत्नी व अभिनेत्री स्नेहल तरडे यांना भावना अनावर झाल्या. चित्रपटाविषयी बोलताना त्या प्रचंड भावनिक झाल्या होत्या.

Deool Band 2 Teaser Launch : गेल्या काही दिवसांपासून देऊळ बंद 2 (Deool Band 2) या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे . 2015 मध्ये आलेला देऊळ बंद या चित्रपटाचा दुसरा भाग तब्बल 11 वर्षांनी प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यामुळे स्वामीभक्त आणि प्रेक्षकांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण आहे. देऊळ बंद 2 या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर आता या चित्रपटाचा टीचर अक्कलकोट स्वामींच्या मंदिरात मोठ्या जल्लोषात पार पडला. यावेळी स्वामी भक्तांनी प्रवीण तरडे आणि कलाकारांना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. स्वामी भक्तांच्या मांदियाळीत प्रवीण तरडे आणि संपूर्ण टीमने चित्रपटाचा टिझर प्रदर्शित केला. यानंतर प्रवीण तरडेची पत्नी व अभिनेत्री स्नेहल तरडे यांना भावना अनावर झाल्या. चित्रपटाविषयी बोलताना त्या प्रचंड भावनिक झाल्या होत्या.

काय म्हणाल्या स्नेहल तरडे ?

अभिनेत्री स्नेहल तरडे म्हणाल्या, " हा चित्रपट आम्ही समर्पित करतोय अशा स्त्रियांना, ज्या आपल्या कुटुंबासाठी, परिवारासाठी आपल्या सर्वस्व कोणाला लावतात. लढत असतात,कष्ट करत असतात. त्यांच्या कष्टाची कोणी दखल घेवो, न घेवो त्यांना फरक पडत नाही. त्या कष्टाचा त्यांना बदला मिळो, न मिळो त्यांना फरक पडत नाही. उद्या आपल्या कुटुंबाच्या उत्कर्षासाठी लढत राहतात. शेवटच्या श्वासापर्यंत मुला बाळांसाठी कष्ट सोसत असतात अशा स्त्रियांना 'देऊळ बंद 2 आता परीक्षा देवाची ' हा चित्रपट समर्पित करत आहोत. स्वामींचे पुन्हा एकदा खूप खूप आभार.त्यांनी आम्हाला ही संधी दिली. काम करण्याची प्रेरणा दिली,  शक्ती दिली.चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे निर्माते कैलाश वाणी यांचे खूप आभार. " असं स्नेहल तरडे म्हणाल्या. चित्रपटाविषयी बोलताना त्यांना भरून आले होते. 

कधी प्रदर्शित होणार चित्रपट ?

2015 मध्ये स्वामी समर्थांच्या महिमेवर आधारित देऊळ बंद हा सिनेमा प्रचंड गाजला. पहिल्या भागात स्वामींनी परदेशातून आलेल्या शास्त्रज्ञाच्या आलिशान चर्चा कीतून प्रवास केला होता.आता देऊळ बंद 2 मध्ये स्वामी एका गरीब महिलेच्या सामान्य दुचाकीवरून प्रवास करताना दिसणार आहेत.आणखी एका सामान्य कुटुंबाची,असामान्य गोष्ट या चित्रपटातून पाहिला मिळणार अस दिसतय. 21 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे .दरम्यान आज या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला. अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरात टिझर लॉन्च चा हा कार्यक्रम पार पडला.

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Thriller Movie: जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
Salman Khans SVC63: राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
Mallika Sherawat: 21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
Rajkummar Raos Prahaar: कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Embed widget