एक्स्प्लोर

Pravin Tarde On Ajit Pawar Biopic: 'आता बायोपिक अजित पवारांवरच...'; प्रवीण तरडेंचं ठरलंय, म्हणाले, 'अनेकांनी कोरे चेक दिले पण...'

Pravin Tarde On Ajit Pawar Biopic: प्रवीण तरडे यांनी आनंद दिघेंवर 'धर्मवीर' आणि 'धर्मवीर 2' केल्यानंतर अजितदादांवर बायोपिक करण्याची इच्छा प्रवीण तरडे यांनी व्यक्त केली आहे.

Pravin Tarde On Ajit Pawar Biopic: मराठी सिनेसृष्टीत (Marathi Film Industry) काही सिनेमे (Marathi Movies) असे आले, ज्यांनी मराठी इंडस्ट्रीला एका नव्या वळणावर नेऊन उभं केलं. त्यापैकी काही मोजक्या सिनेमांची नावं घ्यायची झाली तर, त्यापैकी 'देऊळ बंद' (Deool Band), 'मुळशी पॅटर्न' (Mulshi Pattern), 'धर्मवीर' (Dharmaveer), 'धर्मवीर 2' (Dharmaveer 2) या सिनेमांची आणि हे सिनेमे पडद्यावर साकारणाऱ्या अभिनेता, दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता अशा विविध भूमिकांमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांचं नाव घ्यावं लागेल. प्रवीण तरडे यांनी आपले वेगळ्या ढाटणीचे सिनेमे साकारुन सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीय. ग्रामीण ढंगातील कथा, दमदार संवाद आणि वास्तववादी मांडणी ही त्यांच्या सिनेमांची ओळख. आता काही दिवसांतच त्यांचा 'देऊळ बंद 2' (Deool Band 2) सिनेमा येतोय, याच निमित्तानं दिलेल्या एका मुलाखतीत 'धर्मवीर'नंतर जर बायोपिक करायचा झालाच, तर दिवंगत राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्यावरच करेन, असा मानस दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी बोलून दाखवला आहे. 

महाराष्ट्र टाईम्सच्या 'मटा कट्टा'वर बोलताना प्रवीण तरडे यांनी आनंद दिघेंवर 'धर्मवीर' आणि 'धर्मवीर 2' केल्यानंतर अजितदादांवर बायोपिक करण्याची इच्छा प्रवीण तरडे यांनी व्यक्त केली आहे.  'धर्मवीर' हिट झाल्यानंतर प्रवीण तरडेंना अनेक नेत्यांनी, राजकारण्यानी बायोपिक करण्यासाठी विचारणा केलेली, पण त्यांनी सर्वांच्या ऑफर परत पाठवल्यात, असंही सांगितलं. 

प्रवीण तरडे  नेमकं काय म्हणाले? (Pravin Tarde On Ajit Pawar)

'देऊळ बंद 2'चे दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले की, "मुळशी पॅटर्न'नंतर माझ्याकडे अनेक ऑफर आल्या. अनेकांना असं वाटायचं की, आता आपल्याकडे पैसा आहे, नाव आहे, त्यामुळे कुणावरही सिनेमा करायला मी तयार होईन... पण मी खूप ऑफर परत पाठवल्यात... 'आमच्यावर सिनेमा करा', 'आमच्या नेत्याची कथा सांगा', अशा कितीतरी मागण्या आल्या. अनेक पुढाऱ्यांनी कोऱ्या चेकपासून ते अफाट बजेटपर्यंतच्या ऑफर दिल्या, पण मी प्रत्येक वेळी स्वतःला एकच प्रश्न विचारला, 'मी हे मनापासून करू शकतो का?"

"आनंद दिघेसाहेबांवर सिनेमा केल्यानंतर मला वाटलेलं की, आता यापुढे कुणावर चरित्रपट करायचा नाही. कारण, तो विषय माझ्यासाठी केवळ सिनेमा नव्हता, ती एक भावनिक जबाबदारी होती... त्यामुळे त्यानंतर कुणावरही तसंच काम करणं सोपं नव्हतं... पण, जर कधी मला पुन्हा एखादी बायोपिक करावीशी वाटलीच, तर ती अजितदादांवर असेल... कारण, अजितदादांना मी जवळून पाहिलंय. त्यांची काम करण्याची पद्धत अनुभवलीय...", असं प्रवीण तरडे म्हणालेत. 

पुढे बोलताना प्रवीण तरडे म्हणाले की, "सकाळी सहा वाजता कामाला सुरुवात करणारा मंत्री मी दादांच्या रूपात पाहिलाय. मंत्रालयाच्या पायऱ्यांनाही कदाचित त्यांच्या पावलांची सवय झाली असेल. आजही त्या पायऱ्या म्हणत असतील की, सकाळी सकाळी धावत येणारी ती पावलं कुठे गेली? इतकी कामाशी नाळ जोडलेली माणसं फार कमी पाहायला मिळतात... त्यांच्या आयुष्यातला संघर्ष, वेग, दबाव आणि कामाचा ध्यास हा सिनेमाचा विषय होऊ शकतो, असं मला प्रामाणिकपणे वाटतं..." 

प्रवीण तरडे यांच्याबाबत थोडंस... 

प्रवीण तरडे हे मराठी सिनेसृष्टीतील बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. प्रवीण तरडे यांनी अनेक गाजलेल्या मराठी सिनेमांचं लेखन आणि दिग्दर्शन केलंय. विशेषतः 'मुळशी पॅटर्न', 'धर्मवीर' आणि 'सरसेनापती हंबीरराव' यांसारख्या सिनेमांमुळे त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली. त्यांच्या सिनेमांमध्ये सामाजिक वास्तव, राजकीय घडामोडी आणि ग्रामीण जीवनाचं प्रभावी चित्रण पाहायला मिळतं. अभिनयातही त्यांनी आपल्या वेगळ्या शैलीची छाप सोडली आहे. खडतर, रांगड्या आणि प्रभावी व्यक्तिरेखा साकारण्यात त्यांचा हातखंडा मानला जातो. मराठी सिनेसृष्टीत आशयप्रधान आणि मोठ्या कॅनव्हासवरील सिनेमांना नवी दिशा देणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये प्रवीण तरडे यांचं नाव आवर्जून घेतलं जातं.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Pravin Tarade On Casting Of Snehal Tarade: ‘देऊळ बंद 2’मध्ये गश्मीर महाजनी नाही, तर पत्नी स्नेहल तरडेला मुख्य भूमिका का? दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Raj on SIR: अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Mi Jinkun Ghein Saar: अनिकेत-छवीच्या नव्या आयुष्याला ग्रहण! शांभवीचं नवं कारस्थान, 'मी जिंकून घेईन सारं'मध्ये मोठा ट्विस्ट
अनिकेत-छवीच्या नव्या आयुष्याला ग्रहण! शांभवीचं नवं कारस्थान, 'मी जिंकून घेईन सारं'मध्ये मोठा ट्विस्ट
Crime Petrol Host: अनूप सोनीच्या जागी बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता करणार 'क्राइम पेट्रोल' होस्ट ,कधी पासून पाहता येणार?
अनूप सोनीच्या जागी बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता करणार 'क्राइम पेट्रोल' होस्ट ,कधी पासून पाहता येणार?
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Manoj Jarange Patil Defender Car: मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
Embed widget