एक्स्प्लोर

Crime Petrol Host: अनूप सोनीच्या जागी बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता करणार 'क्राइम पेट्रोल' होस्ट ,कधी पासून पाहता येणार?

अनेक प्रकरणांमध्ये आरोपी हा पीडिताच्या ओळखीचा, घरचा किंवा जवळचा व्यक्ती असल्याचं समोर येतं. अशाच धक्कादायक वास्तवावर नव्या पर्वातून प्रकाश टाकला जाणार आहे.

Crime Patrol New Season : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय क्राईम शो ‘क्राइम पेट्रोल’( Crime Petrol) पुन्हा एकदा नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र यावेळी शोमध्ये एक मोठा बदल पाहायला मिळणार आहे. अनेक वर्षं आपल्या दमदार आवाजातून आणि ‘सावधान, सतर्क राहा’ या अंदाजातून प्रेक्षकांना गुन्हेगारीच्या घटनांची माहिती देणारे अनूप सोनी (Anup Soni) आता या शोमध्ये दिसणार नाहीत. त्यांच्या जागी बॉलिवूडचा सिंघम अर्थात अजय देवगण (Ajay Devgan) सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. अलीकडेच सोनी मराठीवर 'कोण होणार मराठी करोडपती' या शोच सूत्रसंचालन करण्यासाठी माधुरी दीक्षित उतरली आहे. दुसरीकडे 'क्राइम पेट्रोल' या लोकप्रिय टीव्ही शोचा अनेक वर्ष चेहरा असणाऱ्या अनुप सोनी यांच्या जागी अभिनेता अजय देवगन दिसणार आहे. TRP च्या स्पर्धेत सोनी TVने आता थेट लोकप्रिय चेहरे उतरल्यामुळे एकच चर्चा रंगली आहे.

अजय देवगणच्या आवाजात ऐकायला मिळणार गुन्ह्यांच्या धक्कादायक कहाण्या

सोनी टीव्हीचा लोकप्रिय शो ‘क्राइम पेट्रोल’ आता ‘क्राइम पेट्रोल: क्राइम का करेंट’ या नव्या पर्वासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नव्या सीझनमध्ये केवळ गुन्ह्यांच्या कहाण्यांची मांडणीच नाही, तर त्यांचा सादरीकरणाचा अंदाजही बदलणार आहे. शोचा नवा प्रोमो नुकताच समोर आला असून, यात अजय देवगण समाजातील गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांवर भाष्य करताना दिसत आहे. विशेष म्हणजे, गुन्हे करणारे नेहमीच अनोळखी नसतात, तर अनेकदा आपल्या आसपासचे आणि अगदी जवळचे लोकच असू शकतात, याकडे अजय देवगण लक्ष वेधताना दिसतोय. लहानपणी अनोळखी व्यक्तींपासून सावध राहण्याचा सल्ला दिला जायचा. रात्री घराला कुलूप लावण्यापासून ते अनोळखी व्यक्तींपासून अंतर ठेवण्यापर्यंत अनेक गोष्टी सांगितल्या जायच्या. मात्र आजच्या काळात गुन्ह्यांचं स्वरूपच बदललं आहे. अनेक प्रकरणांमध्ये आरोपी हा पीडिताच्या ओळखीचा, घरचा किंवा जवळचा व्यक्ती असल्याचं समोर येतं. अशाच धक्कादायक वास्तवावर नव्या पर्वातून प्रकाश टाकला जाणार आहे.

‘या वेळी मी असेल तुमच्या सोबत...’

प्रोमोमध्ये अजय देवगण म्हणतो, या वेळी ‘क्राइम पेट्रोल’मध्ये देशाला हादरवून टाकणाऱ्या काही घटनांची कहाणी समोर आणली जाणार आहे. मात्र या घटना पाहताना केवळ घाबरून जाण्याऐवजी त्यातून समजून घेणं आणि सावध होणं महत्त्वाचं आहे, असा संदेशही तो  देताना दिसतोय. “या वेळी मी असेल तुमच्या सोबत,” अशा आशयाचं कॅप्शन देत निर्मात्यांनी अजय देवगणचा प्रोमो शेअर केला आहे. त्यामुळे ‘सिंघम’नंतर आता अजय देवगण छोट्या पडद्यावरही प्रेक्षकांना गुन्हेगारीच्या विश्वाची थरारक सफर घडवताना दिसणार आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by sonytvofficial (@sonytvofficial)

31 ऑगस्टपासून सुरू होणार नवं पर्व

‘क्राइम पेट्रोल: क्राइम का करेंट’ हा शो 31 ऑगस्ट 2026 पासून Sony Entertainment Television वर प्रसारित होणार आहे. तसेच प्रेक्षकांना हा शो SonyLIV वरही पाहता येणार आहे. रिपोर्ट्सनुसार, शोच्या पहिल्या 15 भागांचं शूटिंग पूर्ण झालं आहे. या नव्या पर्वामुळे अजय देवगणचं छोट्या पडद्यावरील सूत्रसंचालन क्षेत्रात पदार्पण होणार आहे. त्यामुळे त्याचा हा नवा अंदाज पाहण्यासाठी चाहत्यांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे.

‘क्राइम पेट्रोल’ म्हटलं की सर्वात आधी आठवतात ते अनूप सोनी. अनेक वर्षं त्यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. 2010 ते 2018 या काळात त्यांनी शोची धुरा सांभाळली आणि त्यांच्या विशिष्ट शैलीमुळे ‘क्राइम पेट्रोल’ला वेगळी ओळख मिळाली. अनूप सोनी यांच्या निवेदनाचा अंदाज आणि त्यांचा ‘सावधान, सतर्क राहा’ हा डायलॉग आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आता अनेक वर्षांनंतर त्यांच्या जागी अजय देवगण दिसणार असल्याने ‘क्राइम पेट्रोल’चं हे नवं पर्व प्रेक्षकांसाठी किती वेगळं ठरतं, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Crime Petrol Host: अनूप सोनीच्या जागी बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता करणार 'क्राइम पेट्रोल' होस्ट ,कधी पासून पाहता येणार?
अनूप सोनीच्या जागी बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता करणार 'क्राइम पेट्रोल' होस्ट ,कधी पासून पाहता येणार?
Amrapali Dubey: प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय; लेकीच्या निर्णयानं वडील नाराज; म्हणाले, 'समाज...'
प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय; लेकीच्या निर्णयानं वडील नाराज; म्हणाले, 'समाज...'
Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
OTT Webseries: Netflix वर 6 एपिसोडच्या वेबसीरिजचा धुमाकूळ, रिलीज होताच नं -1 ला ट्रेंडिंग; देशभक्ती जागवणारा जबरदस्त थरार, Must Watch
Netflix वर 6 एपिसोडच्या वेबसीरिजचा धुमाकूळ, रिलीज होताच नं -1 ला ट्रेंडिंग; देशभक्ती जागवणारा जबरदस्त थरार, Must Watch
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
Amrapali Dubey: प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय; लेकीच्या निर्णयानं वडील नाराज; म्हणाले, 'समाज...'
प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय; लेकीच्या निर्णयानं वडील नाराज; म्हणाले, 'समाज...'
Embed widget