एक्स्प्लोर

Pravin Tarade On Casting Of Snehal Tarade: ‘देऊळ बंद 2’मध्ये गश्मीर महाजनी नाही, तर पत्नी स्नेहल तरडेला मुख्य भूमिका का? दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले...

Pravin Tarade On Casting Of Snehal Tarade: 'देऊळ बंद 2'मध्ये गश्मीर महाजनी यानं साकारलेला राघव शास्त्री दिसणार नाही. तर, या सिनेमात एका शेतकरी महिलेची व्यथा मांडण्यात आली आहे.

Pravin Tarade On Casting Of Snehal Tarade: मराठी सिनेसृष्टीत (Marathi Film Industry) गाजलेला सिनेमा 'देऊळ बंद'च्या (Deool Band) पार्श्वभूमीवर आता यातलाच पुढचा भाग 'देऊळ बंद 2' (Deool Band 2) येत आहे. नुकताच या बहुप्रतिक्षित सिनेमाचा टीझर लाँच (Deool Band 2 Teaser Launch) सोहळा अक्कलकोट इथे श्री स्वामी समर्थ (Shree Swami Samarth) यांच्या साक्षीनं पार पडला. या कार्यक्रमाला सिनेमातील कलाकार आणि निर्माते-दिग्दर्शक उपस्थित होते. सुमारे दहा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'देऊळ बंद' (Marathi Movie Deool Band) या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं होतं. पहिल्या भागात गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) यानं राघव शास्त्रींची मध्यवर्ती भूमिका साकारलेली. त्यामुळे दुसऱ्या भागातही कथा त्याच पात्राभोवती फिरणार, अशी प्रेक्षकांची अपेक्षा होती. पण, दिग्दर्शक प्रवीण तरडे (Director Pravin Tarde) यांनी मात्र, यावेळी कथाच बदलली आणि त्यासोबतच सिनेमातलं मुख्य पात्रसुद्धा बदललं.  

'देऊळ बंद 2'मध्ये गश्मीर महाजनी यानं साकारलेला राघव शास्त्री दिसणार नाही. तर, या सिनेमात एका शेतकरी महिलेची व्यथा मांडण्यात आली आहे. यावेळी सिनेमात अभिनेत्री स्नेहल तरडे मुख्य भूमिकेत झळकणार आहे. 'धर्मवीर' सिनेमात स्नेहल तरडे हिनं साकारलेल्या बिर्जे बाईंची भूमिका खूपच गाजलेली. अशातच आता 'देऊळ बंद 2'मध्ये स्नेहल मुख्य भूमिकेत झळकणार आहे. अशातच गश्मीर महाजनीऐवजी स्नेहलला प्रमुख भूमिकेत का निवडण्यात आलं? याबाबत दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी एका मुलाखतीत बोलताना नुकतंच स्पष्टीकरण दिलंय. 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलं. 

'देऊळ बंद 2'चे दिग्दर्शक प्रवीण तरडे नेमकं काय म्हणाले? (Pravin Tarade On Deool Band 2)

'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना'देऊळ बंद 2'चे दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले की, "पुरुष बाहेर खूप रुबाबात फिरतो. खतरनाक तरडे, रांगडा प्रवीण तरडे, डॅशिंग प्रवीण तरडे हे सगळं आपण केव्हा मिरवतो जेव्हा घरामध्ये अशी गृहलक्ष्मी असते. नीट पाहिलं तर इंडस्ट्रीला एक शाप आहे ‌की, संसार उध्वस्त होतात, कलाकार एकटे राहतात, अर्धवट संसार मोडतात , माझा अहंकार तुझा अहंकार... माझं करिअर... पण नंतर जेव्हा वय उलटून जातं आणि एकटेपणा माणसाला खायला लागतो, तेव्हा आपल्याला समजून येतं. पण ज्यावेळी नवरा बायको पैकी एक कोणीतरी असं समजूतदार असतं त्यावेळी ते संसार सोन्यासारखे होतात..."

View this post on Instagram
 
A post shared by Pravin Vitthal Tarde (@pravinvitthaltarde)

"अभिनयाची सर्व बक्षीस जिंकत असताना एक तेवीस वर्षाची पोरगी ठरवते की प्रवीण आपलं क्षेत्र असं नाहीये की इथे आपल्याला रोज पैसा भेटतो त्यामुळे एक काम कर ... तू काम कर बिनधास्त, मी घर सांभाळते मी नोकरी करते; म्हणून तिने पोलीस डिपार्टमेंट मध्ये नोकरी केली. तिच्या पगारावरती घर चाललं पहिले तीन-चार वर्ष! त्यानंतर माझ्या सिरीयल हिट व्हायला लागल्या... त्यामध्ये 'कुंकू', 'पिंजरा' , 'दूर्वा', 'तुझं माझं जमेना' यांचा समावेश होता. त्यानंतर 'रेघे' सिनेमा लिहिला, 'कुटुंब' लिहिला, 'पितृऋण' लिहिला... हळूहळू पैसे येऊ लागले. हे सगळं तिच्या कष्टांमुळे झालेलं...", असं 'देऊळ बंद 2'चे अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले. 

"बरेचदा पुरुष जग पालथं घालतो, पण हे ज्या स्त्रीमुळे घडतं तिचे आभार मानायचे राहून जातात..." (Pravin Tarade On Snehal Tarade)

पुढे बोलताना दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले की, "मुलाच्या शाळेची फी तिच्या पगारातून भरली जायची. त्यामुळे माझी ही एक जबाबदारी होती. जर प्रवीण तरडे कोण? हे जगाला कळलं असेल, तर ते तिने योगदान दिलं म्हणून... बरेचदा पुरुष जग पालथं घालतो, पण हे ज्या स्त्रीमुळे घडतं तिचे आभार मानायचे राहून जातात , तिच्या उपकाराची परतफेड करायची राहून जाते. त्यामुळे स्नेहलने जे काही माझ्यासाठी केलं त्यासाठी मी हे थोडंसं केलं."

"... तू खूप मोठी अभिनेत्री आहेस" (Pravin Tarade Dircted Deool Band 2)

"काहीच नव्हतं माझ्याकडे. साध्या दहा बाय दहाची खोलीत आम्ही राहायचो. त्याचे पैसे भरायलाही पैसे नव्हते तेव्हा ती म्हणायची की, काळजी करू नकोस पाच तारखेला माझा पगार होईल तेव्हा भरू. त्यानंतर 'देऊळ बंद' आला, 'मुळशी पॅटर्न' आला, अगदी 'सर सेनापती हंबीरराव' येईपर्यंत ती नोकरी करत होती. 'मुळशी पॅटर्न'मुळे माझं लाईफ बदललं, तेव्हा मी तिला म्हणालो की, स्नेहल आता नोकरी करणं थांबव आणि अभिनय करणं सुरू कर... तू खूप मोठी अभिनेत्री आहेस. तिने जे काही सुरू केलं... 'धर्मवीर'मध्ये एकच बिरजेबाईची झलक दिली आणि त्यावर्षीची सगळी बक्षीस तिनं मिळवली. प्रसाद ओकनं आपल्या अभिनयानं तो सिनेमा व्यापून टाकला होता, पण त्यामध्ये बिरजेबाई जे काही भाव खाऊन गेली त्यात तिनं सर्व अभिनयाची पारितोषिक जिंकली...", असं प्रवीण तरडे म्हणाले.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Abhishek Bachchan Riteish Deshmukh Raja Shivaji: 'राजा शिवाजी'साठी एकही रुपयाचं मानधन का घेतलं नाही? अखेर अभिषेक बच्चन यानं मौन सोडलं, म्हणाला...

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Embed widget