Deepa Parab Chaudhari - Ankush Chaudhari : दुग्धशर्करा योग... आज घरी परततांना; दिपा परब-अंकुश चौधरीला झी चित्र गौरव पुरस्कार, शेअर केल्या गोड भावना
Deepa Parab Chaudhari - Ankush Chaudhari : अभिनेत्री दिपा परब चौधरी आणि अंकुश चौधरी या दोघांनाही झी चित्र गौरव सोहळ्यात पुरस्कार मिळाले आहेत.
Deepa Parab Chaudhari - Ankush Chaudhari : केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित महाराष्ट्र शाहीर (Maharshtra Shahir) आणि बाईपण भारी देवा (Baipan Bhari Deva) या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. या दोन्ही चित्रपटांतील कलाकारांना यंदाच्या झी चित्र गौरव पुरस्कार (Zee Chitra Gaurav Award) सोहळ्यात गौरवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या सोहळ्यात बाईपण भारी देवा या चित्रपटातील सहाही अभिनेत्रींना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींचा पुरस्कार मिळालाय. पण या सोहळ्याची एक गोड आठवण अभिनेत्री दीपा परब चौधरीने (Deepa Parab Chaudhari) शेअर केलीये. या सोहळ्यात अंकुश चौधरीला (Ankush Chaudhari) महाराष्ट्र शाहीर या चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला आहे.
'बाईपण भारी देवा' चित्रपटात सुकन्या कुलकर्णी-मोने (Sukanya Mone Kulkarni) , दीपा परब (Deepa Parab), वंदना गुप्ते (Vandana Gupte), शिल्पा नवलकर (Shilpa Navalkar), सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar) आणि रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi) या अभिनेत्रींची मुख्य भूमिका आहे. तर महाराष्ट्र शाहीर या चित्रपटात अंकुश चौधरी, सना शिंदे, अश्विनी महांगडे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
दीपाने पोस्टमध्ये काय म्हटलं?
दुग्धशर्करा योग..! 2023 हे वर्ष खूप सुंदर गेलंच पण 2024 ची सुरुवात देखील तितकीच सुंदर आणि आनंद देणारी आहे. यावर्षी झी चित्र गौरव २०२४ या सोहळ्यात आम्हा दोघांनाही ‘बाईपण भारी देवा’ आणि ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटांसाठी अवॉर्ड्स मिळाले आणि हे शक्य होण्यासाठी त्यामागील एकमेव दुवा म्हणजे यशस्वीपणे दोन्ही चित्रपटांची धुरा सांभाळणारा कॅप्टन ऑफ द शिप… दिग्दर्शक केदार शिंदे. शाहिरांच्या भूमिकेसाठी अंकुशची निवड असो वा माझ्या इंडस्ट्रीतील कम बॅक साठी बाईपण सारखा चित्रपट तुझी दूरदृष्टी आणि आम्हा दोघांवरील विश्वास यामुळेच आज घरी परततांना 2-2 ट्रॉफिज हातात असतात. हे दोन्ही चित्रपट आणि ह्या असंख्य आठवणी नेहमीच आमच्या मनात घर करून राहतील.
View this post on Instagram
यंदाचा 'झी चित्र गौरव 2024' गाजवला महिलांनी
बॉक्स ऑफिसवर हे वर्ष खऱ्या अर्थाने महिलांनी गाजवले आहे. बॉक्स ऑफिससह यंदाचा 'झी चित्र गौरव 2024'देखील महिलांनी गाजवला आहे. उषाताई मंगेशकर यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर यावर्षीच्या 'मराठी पाऊल पडते पुढे’ पुरस्काराची मानकरी ठरली ती म्हणजे 'प्रिया बापट'. तसेच ह्या सोहळ्यात हिंदी चित्रपटसृष्टीतल्या दोन अशा अभिनेत्रींनी उपस्थिती लावली ज्यांनी आपल्या नृत्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्या अभिनेत्री म्हणजे ‘शिल्पा शेट्टी’ आणि दुसरी म्हणजे ‘सारा अली खान’. साराने 'ऐका दाजीबा' म्हणत उपस्थित पाहुण्यांचं लक्ष वेधून घेतलं, तर शिल्पा शेट्टी सादर केलेल्या लावणीने हा सोहळा वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला.