Darlings Official Teaser : 'क्या एक मेंढक और बिच्छू दोस्त हो सकते है?'; डार्लिंग्सचा धमाकेदार टीझर रिलीज
डार्लिंग्स (Darlings) या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे.
Darlings Official Teaser : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भटच्या (Alia Bhatt) डार्लिंग्स (Darlings) या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. हा चित्रपट 5 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या चित्रपटात आलियासोबतच शेफाली शाह, विजय वर्मा आणि रोशन मॅथ्यू यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. आलियानं डार्लिंग्स चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.
आलियानं सोशल मीडियावर डार्लिंग्स चित्रपटाचा टीझर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'हा फक्त टीझर आहे, डार्लिंग्स नेटफ्लिक्सवर 5 ऑगस्ट रोजी होणार आहे. ' आलियानं शेअर केलेल्या टीझरला अभिनेत्री रकुल प्रीत आणि सोफिया चौधरी यांनी कमेंट्स केल्या आहेत.
नेटफ्लिक्सच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन देखील या चित्रपटाचा टीझर शेअर करण्यात आला आहे. नेटफ्लिक्सच्या आऊंटवरुन टीझर शेअर करुन त्याला 'क्या एक मेंढक और बिच्छू दोस्त हो सकते है?', असं कॅप्शन देण्यात आलं आहे. चित्रपटाचे संगीत चित्रपट निर्माता-संगीतकार विशाल भारद्वाज यांनी दिले आहे. चित्रपटाचे गीत हे ज्येष्ठ गीतका गुलजार यांनी लिहिले आहेत.
पाहा टीझर :
View this post on Instagram
डार्लिंग्स या चित्रपटाचे दिग्दर्शन जसमीत के रीन यांनी केलं आहे. तर आलिया भट्टच्या इटर्नल सनशाईन प्रॉडक्शन आणि शाहरुख आणि गौरी खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट या प्रॉडक्शन हाऊसने या चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे. आलियाचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये आलियासोबतच रणबीर कपूर, अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय हे देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
- PHOTO : हॉट पिंक मिनी ड्रेस, ‘मॉम टू बी’ आलिया भट्टचा ग्लॅमरस अंदाज!
- PHOTO: आलिया भट्टच्या चेहऱ्यावर दिसला प्रेग्नेंसी ग्लो, पाहा नवे फोटो!