Kapil Sharma : मोठी बातमी! कपील शर्माला जीवे मारण्याची धमकी, बॉलिवुडमध्ये खळबळ; नेमका कोणाचा हात?
Kapil Sharma Death Threatened : विनोदवीर कपिल शर्मा याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Kapil Sharam Threaned : बॉलिवुड अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan Attacked) त्याच्या राहत्या घरात चाकुहल्ला करण्यात आला. पाच दिवस उपचार घेतल्यानंतर त्याला डिस्चार्ज मिळाला. या घटनेनंतर बॉलिवुडमधील कलाकारांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. असे असतानाच आता आपल्या विनोदांनी लोकांना खळखळून हसायला लावणारा विनोदवीर कपील शर्मा (Kapil Sharma) याला जीवे मारण्याची धमकी आली आहे. विशेष म्हणजे कपील शर्माला त्याच्या कुटुंबासह जीवा मारण्यात येईल असं धमकावण्यात आलंय. कपील शर्मासह राजपाल यादव (Rajpal Yadav), नृत्य दिग्दर्शक रेमो डिसुझा (Remo Dsouza) तसेच सुगंधा मिश्रा यांनादेखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीसत्रामुळे बॉलिवुडमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.
कपील शर्माला नेमकी काय धमकी आली?
मिळालेल्या माहितीनुसार अभिनेता राजपाल यादव, सुगंधा मिश्रा आणि रेमो डिसुझा यांच्यानंतर आता विनोदवीर कपिल शर्मा याला जीवे मारण्यात येईल, असं धमकावण्यात आलं आहे. धमकी देणाऱ्याने कपील शर्माला त्याच्या कुटुंबीयांना, सहकाऱ्यांना तसेच शेजाऱ्यांनाही मारण्याची धमकी दिली आहे. टा घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. धमकी मिळताच अंबोली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 351(3) अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर तक्रार दाखल होताच मुंबई पोलिसांनीही आपला तपास चालू केला आहे.
राजपाल यादव, रेमो डिसुझा यांना धमकी
कपिल शर्मा यांच्यासह अभिनेता राजपाल यादव तसेच नृत्य दिग्दर्शक रेमो डिसुझा आणि सुगंधा मिश्रा यांनाही जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी मिळताच राजपाल यादवने मुंबई पोलिसात तक्रार दिली आहे. इमेलच्या माध्यमातून ही धमकी दिली गेल्याचं म्हटलं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार धमकीच्या या इमेलमध्ये "BISHNU" (बिश्नोई नव्हे) असे लिहिण्यात आले होते. पोलिसांच्या सुरुवातीच्या तपासात हा ई-मेल पाकिस्तानमधून करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.
View this post on Instagram
सैफवर राहत्या घरी चाकू हल्ला
दरम्यान, सैफ अली खानवर त्याच्या रहत्या घरी चाकूहल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सैफ अली खानला अनेक ठिकाणी जखम झाली. एका ठिकाणी चाकूचा तुकडा त्याच्या अंगात घुसला होता. लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रीया करून हा तुटलेला चाकू काढण्यात आला. त्यानंतर आता सैफ अली खानला डिस्चार्ज मिळाला आहे. सैफवर झालेल्या या हल्ल्यानंतर बॉलिवुडमधील कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कलाकार मुंबईत सुरक्षित आहेत का? असे विचारले जात आहे. असे असतानाच आता कपिल शर्मा, राजपाल यादव, रेमो डिसुझा यासारख्या दिग्गजांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. त्यामुळेच बॉलिवुडमधून अस्वस्थता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :
बिग बॉसमधील हिरोईनला मुंबईत घर मिळेना, घरमालकांच्या 'त्या' प्रश्नामुळे चांगलीच भडकली!