एक्स्प्लोर

Will Smith : ‘तू माझ्या मुलाला दुखावलंस, म्हणजे मला...’, विल स्मिथच्या ‘थप्पड’ प्रकरणावर ख्रिस रॉकच्या आईची प्रतिक्रिया

Chris Rock : विल स्मिथने जागेवरून उठून भर सोहळ्यात ख्रिस रॉकच्या कानाखाली लगावली होती. विलच्या या थप्पडचे प्रतिसाद अवघ्या जगभरात उमटले.

Will Smith : यंदाचा ऑस्कर सोहळा (Academy Awards) विल स्मिथच्या (Will Smith) ‘थप्पड’ प्रकरणामुळे चांगलाच गाजला. हॉलिवूड अभिनेता विल स्मिथ, पत्नी जाडा पिंकेट स्मिथ (Jada Pinkett-Smith) हिच्या आजारपणाविषयी उडवलेल्या खिल्लीमुळे होस्ट, कॉमेडीयन ख्रिस रॉकवर (Chris Rock) चांगलाच संतापला. यानंतर विल स्मिथने जागेवरून उठून भर सोहळ्यात ख्रिस रॉकच्या कानाखाली लगावली होती. विलच्या या थप्पडचे प्रतिसाद अवघ्या जगभरात उमटले. आता या प्रकरणावर ख्रिस रॉकच्या आईची प्रतिक्रिया आली आहे.

ख्रिस रॉक याची आई रोझली रॉक (Rosalie Rock) यांनी एका मुलाखतीत यावर भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले की, ‘विलने ख्रिसला कानाखाली लगावली, तेव्हा त्याची पत्नी जाडा हसत होती. टीव्हीवर हा सोहळा पाहताना वाटले की, हे एक स्कीट आहे. पण त्यानंतर विलच्या तोंडून अपशब्द ऐकले, तेव्हा सत्य परिस्थिती कळली. विलने या सोहळ्यात ख्रिसला थप्पड लगावली, ती सगळ्यानांच लागली आहे. त्याने माझ्या मुलाला दुखावलं म्हणजे मलाही दुखावलं आहे. यानंतर त्याने केवळ सोशल मीडियावर पोस्ट लिहित माफी मागितली.’

नेमकं काय झालं?

काहीच दिवसांपूर्वी भव्य ऑस्कर सोहळा पार पडला. यात अभिनेता विल स्मिथने ऑस्कर 2022च्या मंचावर कॉमेडियन ख्रिस रॉकला जोरदार थप्पड लगावली. ख्रिसने स्मिथची पत्नी जाडा पिंकेट-स्मिथच्या टक्कल पडण्याची खिल्ली उडवली होती. ख्रिसने गमतीने जाडाच्या टक्कल पडण्याचा संबंध एका हॉलिवूड चित्रपटाशी जोडला होता. मात्र, जाडा आणि विल स्मिथला ही गोष्ट आवडली नाही. या जोकनंतर संतापपेल्या विल स्मिथने शोच्या मध्यातच स्टेजवर जाऊन ख्रिस रॉकला थप्पड लगावली.

थप्पड प्रकरण विलला पडले महागात!

ऑस्करच्या मंचावरील थप्पड प्रकरण विल स्मिथला चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणामुळे अभिनेत्यावर 10 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा त्याच्या वैवाहिक आयुष्यावरही पारणं झाला आहे. जाडा आणि विलमध्ये इतकं बिनसलंय की, ते दोघे लवकरच घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा आहेत. इतकंच नाही, तर विल स्मिथचा पुढचा चित्रपट ‘फास्ट अँड लूज’च्या चर्चाही आता पूर्णपणे थांबल्या आहेत. ख्रिस रॉकला लगावलेल्या थप्पडचा मोठा फटका विल स्मिथला बसला आहे.

हेही वाचा :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
Embed widget