चित्रांगदासाठी सलमान खानने तंबूत कपडे का बदलले? अभिनेत्रीनं शुटिंगमधील 'तो' किस्सा सांगितला
Chitrangda Singh Opens Up About On-Set Experience: द बॅटल ऑफ गलवानमध्ये चित्रांगदा सिंह आणि सलमान खान पहिल्यांदाच एकत्र.

Chitrangda Singh Opens Up About On-Set Experience: चित्रांगदा आणि सलमान खान ही जोडी पहिल्यांदाच रूपरी पडद्यातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'द बॅटल ऑफ गलवान' या चित्रपटात चित्रांगदा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तिनं अलिकडेच एका मुलाखतीतून सलमान खानसोबत स्क्रीन शेअर करतानाचा अनुभव शेअर केला आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत तिनं चित्रपटादरम्यानचा किस्सा शेअर केला आहे. यात तिनं सलमान खान किती दिलदार व्यक्तिमत्व आहे, याबाबत माहिती दिली. तिचा सलमान खानसोबत काम करतानाचा अनुभव कसा होता? जाणून घेऊयात.
View this post on Instagram
मुलाखतीदरम्यान, चित्रांगदा म्हणाली, "नक्कीच या चित्रपटासाठी मी खूप उत्साही आहे. मी कधीच कल्पना केली नव्हती की मी त्यांच्यासोबत काम करेन. मी आतापर्यंत जी व्यक्तिरेखा साकारली आहे. त्याहून ही व्यक्तिरेखा खूप वेगळी आहे. म्हणून मी कधीच कल्पना केली नव्हती की मी कधी त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करेन. त्यांच्यासोबत काम करणं ही पर्वणीच म्हणेन", असं चित्रांगदा म्हणाली.
सेटवरील वातावरणाबद्दल बोलताना चित्रांगदा सिंह म्हणाली की, "सलमान खानसोबत काम करणे अवघड नव्हते. एखादा सीन पूर्ण करत असताना कोणताही दबाव नसतो. सर्व काही शांतेत, एका प्रवाहात सुरू होते. सेटवर प्रत्येकाची काळजी घेतली जाते. प्रत्येकाला वेळेवर स्नॅक्स आणि ब्रेक मिळतो. सेटवरचे वातावरण खूप चांगले असते", असं सलमान म्हणाले. "पण सुपरस्टारसोबत काम करत असताना अनेक आव्हने असतात. परंतु, त्यांच्यासोबत काम करत असताना मला खूप दबाव जाणवत होता", असं चित्रांगदा म्हणाली.
"चित्रपट सध्या प्रॉडक्शनमध्ये आहे. आमचं अजूनही शुटिंग सुरू आहे. चित्रपट पूर्ण झाला आहे, असं म्हणता येणार नाही. परंतु, आशा आहे हा चित्रपट लवकरच पूर्ण होईल आणा प्रेक्षकांना आवडेल", असं चित्रांगदा म्हणाली.
चित्रपटाच्या घोषणेनंतर चाहत्यांच्या प्रतिक्रियेबद्दल तिनं सांगितलं की, "जेव्हा चित्रपटाची घोषणा झाली, तेव्हा पीआर टीमनं मला प्रतिक्रियांबद्दल सांगितले. सुदैवाने चित्रपटाला चांगलाच प्रसिसाद मिळाला. पण अजूनही या चित्रपटाबाबत एक दबाव आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार जर सोबत स्क्रीन शेअर करत असेल तर, निश्चितच मला स्वत:ला बेस्ट द्यायचं होतं", असं चित्रांगदा म्हणाली.
चित्रांगदाने चित्रपटातील एका गाण्याच्या शुटिंगदरम्यान झालेल्या दुखापतीबद्दल माहिती दिली. ती म्हणाली, "रिहर्सलदरम्यान माझ्या गुडघ्याला दुखापत झाली. मला प्रचंड दुखापत झाली. मला असं वाटलं की कुणीतरी लाथ मारली. मी तिथे विचारले की, कुणी लाथ मारली का? तेव्हा माझ्या ACL फाडण्याचा आवाज इतका मोठा होता की, कॅमेरा फिरण्यापूर्वीच हे सगळं घडले", अशी माहिती चित्रांगदाने दिली.
"यानंतर सलमान खानने खूप मदत केली. सलमान खूप दयाळू आणि मदतगार आहेत. त्यांनी मला व्हॅनमध्ये आराम करण्यास सांगितले. कारण माझी व्हॅन दूर होती. त्यांची व्हॅन जवळच पार्क केली होती. ते कपडे चेंज करण्यासाठी व्हॅनमध्ये गेले नाही. सलमान कपडे बदलण्यासाठी तंबूमध्ये गेले. त्यांनी माझी खरोखर काळजी घेतली", असं चित्रांगदा म्हणाली.
























