(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chinmay Mandlekar : मालोजी राजेंचे उदाहरण देत ज्येष्ठ अभिनेत्याने दिला चिन्मय मांडलेकरला पाठिंबा, येड्याचा बाजार अन्...
Chinmay Mandlekar News : मुलाच्या नावावरून ट्रोलिंग होत असलेल्या चिन्मय मांडलेकरला मराठी सिनेसृष्टीकडून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. आपल्या कसदार अभिनयासाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते शशांक शेंडे यांनी ट्रोलर्सचा चांगलाच समाचार घेतला आहे.
Chinmay Mandlekar : अभिनेता-लेखक चिन्मय मांडलेकरने (Chinmay Mandlekar) आपल्या मुलाचे नाव जहांगीर ठेवल्यावरून ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे चिन्मयचा मुलगा हा सध्या 11 वर्षांचा आहे. मुलाच्या नावावरून ट्रोलिंग होत असलेल्या चिन्मय मांडलेकरला मराठी सिनेसृष्टीकडून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. आपल्या कसदार अभिनयासाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते शशांक शेंडे (Shashank Shende) यांनी ट्रोलर्सचा चांगलाच समाचार घेतला आहे. शशांक शेंडे यांनी छत्रपती शिवराय यांचे आजोबाचे मालोजीराजे भोसले यांचे उदाहरण दिले.
शशांक शेंडे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून चिन्मय मांडलेकरच्या मुलाच्या नावावरून सुरू असलेल्या वादावर आपली भूमिका स्पष्ट करताना ट्रोलर्सला सुनावले आहे. शशांक शेंडे यांनी म्हटले की, "येड्याचा बाजार न खुळ्याचा शेजार"
मुलाचं नाव "जहांगीर " ठेवले , म्हणून वाटेल त्या भाषेत"चिन्मय मांडलेकर" आणि त्याच्या घरच्यांना ट्रोल केलं जातं आहे , कलाकारच "खासगी आयुष्य "ही त्याची "खासगी बाब "आहे , कोणत्याही माणसाला त्यात "हस्तक्षेप " करण्याचा अधिकार नाही ( महाराजांच्या भूमिकेचा संदर्भ घेवून ट्रोल केलं जातं आहे...कोणतीच नावे आपल्या समाजात कधीच निषिद्ध नव्हती , आणि पुढेही नसतील. ) असे म्हटले. आपल्या पोस्टमध्ये शशांक शेंडे यांनी पुढे म्हटले की, माहिती, मालोजी राजांना 2 मुलं होती 1)...शहाजी, 2)...शरीफजी...नावांचे संदर्भ समजावेत ही माफक अपेक्षा आहे असे त्यांनी म्हटले.
View this post on Instagram
चिन्मयसाठी कलाकार मंडळी एकवटली
चिन्मयने आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्यामुळे मुलाचं नाव जहांगीर ठेवल्याने तो चांगलाच ट्रोल झाला. ट्रोलिंगला सामोरे जावं लागत असल्याने चिन्मयने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका न करण्याचा निर्णय घेतला. त्याचे पडसादही उमटू लागले आहेत. अभिनेत्री गौतमी देशपांडे, निर्माता-दिग्दर्शक सुहृद गोडबोले, अभिनेता अक्षय वाघमारे, दिग्दर्शक समीर विद्वंस, सिद्धार्थ चांदेकर यांनी संताप व्यक्त करत चिन्मयला पाठिंबा दिला. चिन्मयने शेअर केलेला व्हिडिओ रिशेअर करत या कलाकार मंडळींनी चिन्मयसाठी पाठिंबा दर्शवला आहे. सध्या सोशल मीडियावर चिन्मयच्या या व्हिडिओची बरीच चर्चा आहे.