एक्स्प्लोर

Chhello Show Controversy : ‘छेल्लो शो’ची ऑस्करवारी वादात; चित्रपटाची निवड अयोग्य म्हणत FWICEचं केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र!

Chhello Show Controversy : फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने (FWICE) या चित्रपटाला केवळ परदेशी चित्रपटच नाही, तर हॉलिवूड चित्रपट 'सिनेमा पॅराडिसो'चा रिमेक असल्याचे देखील म्हटले आहे.

Chhello Show Controversy : पान नलिन (Pan Nalin) यांचा ‘छेल्लो शो’ (Chhello Show) हा चित्रपट आता वादात सापडला आहे. 2023च्या ऑस्कर नामांकनासाठी भारताकडून या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. मात्र, आता फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने (FWICE) या निवडीला अयोग्य म्हणत, चित्रपटाला विरोध केला आहे. यासंदर्भात फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजकडून केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना एक पत्र देखील लिहिण्यात आलं आहे. FWICEने म्हटले की, हा चित्रपट भारतीय चित्रपट नाही. चित्रपटाच्या निवडीची पद्धत योग्य नसून, परीक्षकांनी त्यावर विचार केला पाहिजे.

ऑस्कर नामांकनामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ‘छेल्लो शो’च्या निवडीची घोषणा फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने (FFI) केली होती. या चित्रपटाचे इंग्रजी शीर्षक ‘लास्ट फिल्म शो’ असे आहे. हा चित्रपट भारतात 14 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.

हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक असल्याचा आरोप

फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने (FWICE) या चित्रपटाला केवळ परदेशी चित्रपटच नाही, तर हॉलिवूड चित्रपट 'सिनेमा पॅराडिसो'चा रिमेक असल्याचे देखील म्हटले आहे. मात्र, ही संपूर्ण निवड प्रक्रिया सांभाळणाऱ्या फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने (FFI) ही निवड प्रक्रिया पूर्णपणे योग्य असल्याचे म्हटले आहे. मात्र, 'छेल्लो शो' हा चित्रपट 'सिनेमा पॅराडिसो'पासून प्रेरित असेल, तर हा चित्रपट ऑस्कर निवड फेरीतून बाहेर पडू शकतो.

नेमका वाद काय?

इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनचे (IFTDA) अध्यक्ष आणि चित्रपट निर्माते अशोक पंडित (Ashok Pandit) यांनी यासंदर्भात एबीपी न्यूजशी बोलताना सांगितले की, ‘ऑस्कर नामांकनासाठी 'छेल्लो शो' चित्रपट पाठवणाऱ्या ज्युरींचे अध्यक्ष टीएस नागभरणा यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नमूद केले होते की, 'छेल्लो शो' गेल्या वर्षीही ऑस्करच्या नामांकनासाठी ज्युरींकडे पाठवण्यात आला होता. मात्र, त्यावेळी या चित्रपटाचे प्रदर्शन न झाल्यामुळे ज्युरींनी हा चित्रपट नाकारला आणि आता स्क्रिनिंग झाल्यानंतर हा चित्रपट पुन्हा एकदा पात्र म्हणून घेण्यात आला होता. मात्र, ही पद्धत चुकीची आहे. कोणत्याही चित्रपटाला ऑस्करच्या नामांकनासाठी पाठवण्याचा कालावधी निश्चित केला जातो, म्हणजे चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने प्रमाणित केल्यानंतर तो चित्रपट वर्षभर कोणत्याही पुरस्कार नामांकनात पाठवण्यासाठी पात्र असतो. मात्र, एखाद्या चित्रपटाला एकदा नाकारून, तो पुन्हा ऑस्कर नामांकनासाठी पात्र ठरवणे हे नियमांच्या विरोधात आहे. हे योग्य असेल तर, 10 वर्षे जुने चित्रपटही ऑस्करसाठी पाठवावेत.’

‘छेल्लो शो’ ऑस्करसाठी पाठवणे योग्य नसल्याचे आणखी एक कारण देताना अशोक पंडित म्हणाले की, 'छल्लो शो'ला ऑस्कर नामांकनासाठी पाठवायला नको होते. कारण, हा चित्रपट पूर्णपणे परदेशी कंपनीने तयार केला होता आणि नंतर हा चित्रपट भारतीय निर्मात्यांना देण्यात आला होता. संपूर्णपणे परदेशी कंपनीने बनवलेला हा चित्रपट भारतीय कसा ठरू शकतो? 1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या इटालियन चित्रपट 'सिनेमा पॅराडिसो'चे पोस्टर आणि 'छेलो शो' चित्रपटाचे पोस्टर यांच्यात साम्य दाखवून अशोक पंडित यांनी हा चित्रपट एका अतिशय गाजलेल्या विदेशी चित्रपटाचा रिमेक असल्याचा दावा केला.

निवड प्रक्रियेवर सरकारचे नियंत्रण असावे!

अशोक पंडित यांनी 'छेल्लो शो'ला ऑस्कर नामांकनासाठी पाठवण्यावर तीव्र आक्षेप घेत म्हटले की, ‘आम्ही माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांना तक्रार पत्र लिहून ऑस्कर नामांकनात चित्रपट पाठवण्यासाठीची निवड प्रक्रिया ही फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या (FFI) हातात नसावी. या निवड प्रक्रियेवर सरकारचे नियंत्रण असले पाहिजे, जेणेकरून चित्रपटांच्या निवडीमध्ये आणखी गैरप्रकार होणार नाहीत.’

हेही वाचा :

Oscar 2023 Entry : द कश्मीर फाइल्स, RRR नव्हे तर यंदाची ऑस्कर वारी गुजराती चित्रपटाची, 'छेल्लो शो' ने मारली बाजी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Chhagan Bhujbal : पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar : राष्ट्रवादीचं अधिवेशन, अजित पवारांचं मोठं वक्तव्य... म्हणाले...Praful Patel Shirdi :  धनंजय मुंडेंचा राजीनामा ते भुजबळांची नाराजी; प्रफुल पटेल भरभरुन बोललेNana Patole PC : 'मुंबईत सेलिब्रिटी सुरक्षित नाही,  गावात सरपंच सुरक्षित नाही' : नाना पटोलेSaif Ali Khan Suspect CCTV : सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV, दादरमधील दुकानात घेतले इअरफोन...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Chhagan Bhujbal : पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Embed widget