एक्स्प्लोर
Advertisement
'विधु विनोद चोप्रांमुळे माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आलेली' : चेतन भगत
प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी निर्माते विधु विनोद चोप्रा यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. चेतन भगत यांनी विधू विनोद चोप्रा यांच्या पत्नी अनुपमा चोप्रा यांच्या ट्विटला उत्तर देताना हा आरोप केलाय.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अनेक सेलिब्रिटी नेपोटिझम आणि आऊटसायडर्स यावर आपली मतं मांडताना आणि आपले डिप्रेशनचे अनुभव शेअर करताना दिसत आहेत. यात आता प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी देखील उडी घेतली आहे. चेतन भगत यांनी फिल्ममेकर आणि निर्माते विधु विनोद चोप्रा यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. विधु विनोद चोप्रा यांनी जाहीरपणे माझा अपमान केला. त्यांच्यामुळे आपल्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली होती, असा गंभीर आरोप भगत यांनी केला आहे. चेतन भगत यांच्या 'फाईव्ह प्वाईंट सम वन' पुस्तकावर आधारीत 2009 मध्ये बनलेल्या '3 इडियट्स' चित्रपटाची निर्मिती विधु विनोद चोप्रा यांनी केली होती.
चेतन भगत यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, 'सुशांत सिंह राजपूतच्या दिल बेचारा चित्रपटाबद्दल समीक्षकांनी समजतूदारपणे लिहावं. त्यांनी ओव्हरस्मार्ट होऊन लिखाण करू नये. त्यांनी निष्पक्ष आणि समजूतदार व्हावं, काही घाणेरड्या चाली खेळू नयेत, आपण आधीच अनेकांचं आयुष्य उध्वस्त केलं आहे' असं भगत यांनी म्हटलं.
चेतन भगत यांच्या ट्विटला विधू विनोद चोप्रा यांच्या पत्नी अनुपमा चोप्रा यांनी उत्तर दिलं आहे. 'समजूतदारपणाचा स्तर यापेक्षा खाली जाणार नाही, असा विचार काही जण करतात. मात्र तरीही दुर्दैवानं तो स्तर घसरतो,' असं अनुपमा यांनी म्हटलं. हे ही वाचा- कंगनाच्या टोमण्यांनी तापसी भडकली.. कंगना तडकली त्यांच्या या ट्विटला प्रत्युत्तर देताना भगत यांनी अनुपमा यांचे पती विधू विनोद चोप्रा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 'विधू विनोद चोप्रा यांनी कोणतीही शरम न बाळगता कथेशी संबंधित सर्व पुरस्कार स्वत: घेतले. त्यांनी जाहीरपणे माझा अपमान केला. त्यांनी मला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं,' असा आरोप भगत यांनी केला आहे.Ma'am, when your husband publicly bullied me, shamelessly collected all the best story awards, tried denying me credit for my story and drove me close to suicide, and you just watched, where was your discourse? https://t.co/CeVDT2oq47
— Chetan Bhagat (@chetan_bhagat) July 21, 2020
पुढे चेतन भगत यांनी लिहिलं आहे की,"आणि त्यावेळी आपण केवळ पाहात होतात, त्यावेळी आपले हे उपदेश कुठं होते." या ट्विटवर यूझर उलटसुलट प्रतिक्रिया देत आहेत. संबंधित बातम्याEach time you think the discourse can’t get lower, it does! https://t.co/yhkBUd8VSQ
— Anupama Chopra (@anupamachopra) July 21, 2020
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement