एक्स्प्लोर

Cannes Film Festival 2026: कान्समध्ये भारतीय सिनेमांचा अटकेपार झेंडा; 'या' 5 फिल्म्सचे विषय ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

यावर्षी म्हणजेच 2026 च्या कान्स चित्रपट महोत्सवात भारतीय 6 चित्रपट दाखवले जाणार आहेत.

Cannes Film Festival: जगातील अत्यंत प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांपैकी समजल्या जाणाऱ्या कान्स चित्रपट महोत्सवाची सध्या मनोरंजनसृष्टीत एकच चर्चा आहे. 12 मे ते 23 मे या कालावधीत आयोजित करण्यात आलेला हा चित्रपट महोत्सव दरवर्षी फ्रेंच रिविएरा येथे होतो. या चित्रपट महोत्सवात कोणत्या चित्रपटांचा समावेश होणार याकडे जगभरातील चित्रपटप्रेमी व निर्मात्यांचे लक्ष असते.  गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय चित्रपटांनीही या महोत्सवात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. 'ऑल दॅट ब्रीथ्स ' 'ऑल वी इमॅजिन ॲज लाईट ' ' होमबाऊंड ' यांसारख्या चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजले गेले. यावर्षी म्हणजेच 2026 च्या कान्स चित्रपट महोत्सवात भारतीय 6 चित्रपट दाखवले जाणार आहेत.

1. अम्मा अरियान

मल्याळम सिनेमाची ही क्लासिक फिल्म ' अम्मा अरियान ' या चित्रपटाला कान्स चित्रपट महोत्सवातील ' कान्स क्लासिक्स ' सेक्शन मध्ये  समाविष्ट करण्यात आलं आहे. 1986 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट जॉन अब्राहमचा मास्टरपीस मानला जातो. या चित्रपटाची कथा पुरुषन नावाच्या एका तरुण कार्यकर्त्याभोवती फिरते. हा त्याच्या साथीदारांसह एका आईला तिचा मुलगा हरीच्या मृत्यूची बातमी देण्यासाठी निघालाय. हा प्रवास हळूहळू दुःख, राजकीय प्रतिकार, युवा चळवळ आणि वैचारिक संकटांची खोली दाखवणारा ठरतो.

2. बालन : द बॉय

फिल्ममेकर चिदंबरम यांचा बालन द बॉय हा मल्याळी चित्रपट कान्स चित्रपट महोत्सवाच्या ' मार्चे डू फिल्म ' या विभागात दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाची कथा त्याग भावनिक अस्थिरता आणि कठीण सामाजिक परिस्थितीत आपली ओळख शोधणाऱ्या बालन या मुलाभोवती फिरते. मायलेकाच्या नात्यातील गुंतागुंतीचे चित्र आणि या चित्रपटात करण्यात आलं आहे. हा चित्रपट एकटेपणा संघर्ष आणि आत्मविश्वास अशा भावनांना स्पर्श करणारा आहे.


Cannes Film Festival 2026: कान्समध्ये भारतीय सिनेमांचा अटकेपार झेंडा; 'या' 5 फिल्म्सचे विषय ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

3. चारडिकला

पंजाबी सिनेमाला जागतिक स्तरावर नेणाऱ्या दिग्दर्शक अमरजीत सिंग सर्व यांच्या 'चारडिकला ' या चित्रपटाचा प्रीमियर यावर्षी कान्स चित्रपट महोत्सवा आता दाखवला जाणार आहे. या चित्रपटात एमी विर्क आणि रुपी गिल प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाची कथा एका समर्पित नर्सची कथा आहे. या नर्सच्या शांत  आयुष्यात अनेक उलथापालथी घडतात. एका खोट्या केस मध्ये तिला गोवलं जातं.नंतर आलेल्या एकटेपणाचा सामना करण्यासाठी ती दुसऱ्यांची मदत करते. संघर्ष करणाऱ्या कुटुंबांचा सहारा बनते. हा चित्रपट 29 मे ला चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे.


Cannes Film Festival 2026: कान्समध्ये भारतीय सिनेमांचा अटकेपार झेंडा; 'या' 5 फिल्म्सचे विषय ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

4.सितंबर 21

दिग्दर्शक करेन क्षिती सुवर्णा यांची पहिली फिचर फिल्म 'सितंबर 21 ' या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर 16 मे रोजी कान्सच्या पॅलेस थिएटरमध्ये होणार आहे. हिंदी आणि कन्नड भाषेमध्ये बनलेल्या या चित्रपटात एका वृद्ध अल्झायमर झालेल्या रुग्णाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. या रुग्णाची पत्नी कोविड महामारीत शेजारच्या घरात क्वारंटाईन झाली आहे. जशी जशी त्याची स्मृती कमी होत जाते तसा त्याचा दुरावलेला मुलगा घरी परत होतो.वडिलांची काळजी आणि त्यात संतुलन साधनाचा प्रयत्न करतो. अत्यंत भावनिक जबाबदारीच्या ओझ्याखाली दबलेल्या कुटुंबाची काळजी घेतानाच्या गुंतागुंतीवर बनलेला चित्रपट आहे.


Cannes Film Festival 2026: कान्समध्ये भारतीय सिनेमांचा अटकेपार झेंडा; 'या' 5 फिल्म्सचे विषय ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

5.'शॅडोज ऑफ मुनलेस नाईट '

एफटीआयच्या विद्यार्थिनी मेहेर मल्होत्राच्या शाडोज ऑफ द मून लेस नाईट 24 मिनिटांच्या पंजाबी लघुपटाची कान्सच्या 'ला सिनेफ ' विभागासाठी निवड करण्यात आली आहे.या चित्रपटात रंजन नावाच्या कारखान्यातील कामगाराची कथा दाखवण्यात आली आहे.हरणजन रात्रपाळीत काम करताना आर्थिक ताण ,झोपेच्या अभावाने मानसिक तणावाशी झुंज देत असतो. खचाखच भरलेले घर आणि घरची परिस्थिती या सगळ्यात त्याची मानसिक स्थिती हळूहळू ढासळू लागते.


Cannes Film Festival 2026: कान्समध्ये भारतीय सिनेमांचा अटकेपार झेंडा; 'या' 5 फिल्म्सचे विषय ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

6.'सिस्टर ऑफ द वर्ल्ड फ्लॉवर '

लंडन स्थित दिग्दर्शक श्रोमेही चक्रवर्ती यांचा 'सिस्टर ऑफ द वर्ल्ड फ्लॉवर हा माहितीपट कान्सच्या 'मार्च डू फिल्म' मध्ये दाखवला जाणार आहे. हा चित्रपट भारतातील पहिली कायदेशीर महूआ डिस्टिलरी चालवणाऱ्या दोन बहिणींची कथा आहे. मोठी बहीण स्थानिक पेयाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून देण्याचं स्वप्न पाहत असते.तर धाकटा बहिणीला तिची लैंगिक ओळख स्वीकारताना एक पुरुष म्हणून जीवन जगण्याची इच्छा आहे. हा माहितीपट लैंगिक ओळख महत्त्वकांक्षा आणि स्वतःला स्वीकारणे या विषयाला अगदी संवेदनशीलपणे हाताळतो.


Cannes Film Festival 2026: कान्समध्ये भारतीय सिनेमांचा अटकेपार झेंडा; 'या' 5 फिल्म्सचे विषय ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Thriller Movie: जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
Salman Khans SVC63: राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
Mallika Sherawat: 21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
Rajkummar Raos Prahaar: कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Embed widget