Boney Kapoor Transformation Photos Viral: बोनी कपूर यांचं खतरनाक ट्रान्सफॉर्मेशन, घटवलं 26 किलो वजन; Latest Photos पाहून नेटकरीही हैराण
Boney Kapoor Transformation Photos Viral: ब्लॉकबस्टर चित्रपट बनवणारा निर्माता आणि अभिनेता म्हणून ओळखले जाणारे निर्माते केवळ त्यांच्या कामामुळेच नव्हे, तर त्याच्या नवीन फिटनेसमुळेही सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत.

Boney Kapoor Transformation Photos Viral: तुम्ही ज्या व्यक्तीला फोटो पाहताय, तो फोटो आहे, दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचे पती आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूरचे वडील आणि इंडस्ट्रीतले प्रसिद्ध निर्माते बोनी कपूर यांचा. विश्वास नाही बसत ना? बोनी कपूर यांनी जिममध्ये न जाता, तब्बल 26 किलो वजन कमी करून इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.
ब्लॉकबस्टर चित्रपट बनवणारा निर्माता आणि अभिनेता म्हणून ओळखले जाणारे निर्माते केवळ त्यांच्या कामामुळेच नव्हे, तर त्याच्या नवीन फिटनेसमुळेही सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. कॅज्युअल आणि सेमी-फॉर्मल कपड्यांमध्ये बोनी कपूर याच्या ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. फोटोमधला बोनी कपूर यांचा लूक पूर्णपणे थक्का करणारा आहे. अनेक चाहत्यांनी त्यांच्या आकर्षक लूकचं कौतुक केलं आहे, तर काहींना प्रश्न पडला आहे की, या मोठ्या बदलामागील कारण नेमकं काय? हे ट्रान्सफॉर्मेशन नेमकं फिटनेससाठीच आहे ना? असे अनेक प्रश्न बोनी कपूर यांना पडले आहेत.
बोनी कपूर यांनी 26 किलो वजन कसं कमी केलं?
मीडिया रिपोर्टनुसार, बोनी कपूर यांच्या वजन कमी करण्याचं रहस्य त्यांच्या शिस्तबद्ध जीवनशैलीत आहे. बोनी कपूर रात्री जेवत नाहीत आणि रात्री ते फक्त सूप पितात. त्यांचा नाश्ता फळांचा रस आणि ज्वारीची भाकरी एवढाच असतो. तसेच त्यांनी कोणतंही वर्कआऊट रुटिन फॉलो केलेलं नाही. बोनी कपूर दृढ इच्छाशक्ती आणि आहारावरच्या नियंत्रणावर लक्ष केंद्रीत करतात.
View this post on Instagram
जेव्हा पहिल्यांदा मनमोकळेपणानं बोललेले बोनी कपूर
गेल्या वर्षी बोनी कपूर यांनी आपल्या ट्रांसफॉर्मेशन जर्नीबाबत मनमोकळेपणानं गप्पा मारलेल्या, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या हेअर ट्रान्सप्लांटबाबतही सांगितलेलं. ते म्हणालेले की, "माझी पत्नी श्री मला नेहमी म्हणायची, 'बोनी, आधी वजन कमी कर, मगच तुझे केस नीट कर..." दरम्यान, काही लोकांनी बोनी कपूर यांना उलटा सल्ला दिलेल्या. त्यांनी सांगितलेलं की, ज्यांच्या डोक्यावर टक्क आहे, ते सारे भाग्यवान असतात. जसं यश चोप्रा. म्हणून मी काही काळापर्यंत डोक्यावरचं टक्कल तसंच ठेवलेलं. पण, त्यानंतर मात्र बोनी कपूर यांनी हेअर ट्रान्सप्लांटचा पर्याय निवडला. त्यांनी सांगितलं की, शेवटी... एक दिवस... मला हेअर ट्रान्सप्लांट करण्यासाठी गळ घातली गेली. तीन दिवसांत त्यांनी तब्बल 6 हजार केस लावले.
श्रीदेवी यांच्याबाबत काय म्हणाले बोनी कपूर?
आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये केलेल्या बदलांमागे श्रीदेवी यांचं इंस्पिरेशन आहे, असं बोनी कपूर यांनी सांगितलं. ते म्हणाले की, "हेअर ट्रान्सप्लांटपूर्वी वजन कमी करावं अशी माझ्या पत्नीची इच्छा होती, म्हणून मी डाएटिंग सुरू केलं आणि सुमारे 14 किलो वजन कमी केलं. व्यायाम करणं माझ्यासाठी कठीण आहे, परंतु तरीही मी वजन कमी करण्यात यशस्वी झालो."























