एक्स्प्लोर
टीम इंडियाचा सिक्सरकिंग युवराज लवकरच बोहल्यावर
मुंबई : टीम इंडियाचा सिक्सरकिंग युवराज सिंह लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. येत्या डिसेंबरमध्ये युवराज आणि हेझल कीच विवाहबंधनात अडकतील.
युवराज सिंह आणि बॉलिवूड अभिनेत्री हेझल कीच यांचा नोव्हेंबर 2015 मध्ये साखरपुडा झाला होता. बालीमध्ये सुट्टीसाठी गेलेल्या युवराज आणि हेजलने साखरपुडा उरकला होता.
युवीच्या लग्नाची तारीख अजून निश्चित झाली नसली तरी लवकरच जाहीर केली जाईल.
हिंदू आणि शिख दोन्ही पद्धतीने लग्न करणार असल्याची माहिती दोघांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना दिली होती.
हेझल कीच ब्रिटनमध्ये जन्मली असून 2011 साली बॉडीगार्ड' चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement