YRF Announces Release Date: यशराज फिल्म्सच्या आगामी चार बड्या चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर
यशराज फिल्म्सने येत्या वर्षात प्रदर्शीत होणाऱ्या चार चित्रपटांची नावे आणि तारख्या जाहीर केल्या आहेत. बंटी और बबली 2, पृथ्वीराज, जयेशभाई जोरदार आणि शमशेरा या चित्रपटांचा यात समावेश असेल.
YRF Announces Release Date: आदित्य चोपडाच्या यशराज फिल्म्सने येत्या वर्षात प्रदर्शीत होणाऱ्या चार चित्रपटांची नावे आणि तारख्या जाहीर केल्या आहेत. बंटी और बबली 2, पृथ्वीराज, जयेशभाई जोरदार आणि शमशेरा या चित्रपटांचा यात समावेश असेल. बंटी और बबली 2 मध्ये सैफ अली खान, रानी मुखर्जी, सिध्दांत चर्तुर्वेदी दिसून येतील. तर नवोदित अभिनेत्री शर्वरी मुख्य भूमिकेतून दिसून येईल. जगभरात हा चित्रपट 19 नोव्हेंबर 2021 ला प्रदर्शीत होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन वरुण शर्मा करत आहेत.
या चित्रपटानंतर यशराज फिल्म्स आणखी एक मोठ्या बजेटचा चित्रपट घेऊन येणार आहे. 'पृथ्वीराज' असे या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट 21 जानेवारी,2022 मध्ये जगभरात प्रदर्शीत होणार आहे. या चित्रपटात बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार राजा पृथ्वीराज चौहानच्या
भूमिकेतून दिसून येणार आहे. या चित्रपटातून मानुषी छिल्लरने बॉलिवूड विश्वात पदार्पण केले आहे. चित्रपटात संजय दत्त आणि सोनू सूदच्यादेखील महत्तवपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट पृथ्वीराज चव्हाण यांच्या जीवनावर आधारित असणार आहे.
'जयेशभाई जोरदार' कधी होणार प्रदर्शीत
बॉलिवूडचा सूपरस्टार रणवीर सिंह आणि शालिनी पांडे यांचा चित्रपट 'जयेशभाई जोरदार' हा 25 फेब्रुवारी 2022 ला जगभरात प्रदर्शीत होणार आहे. साउथच्या 'अर्जुन रेड्डी' चित्रपटात दिसलेली शालिनी पांडेच या चित्रपटात मुख्य भूमिकेत असेल. या चित्रपटातील रणवीरची
भूमिका खास असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिव्यांग ठाकूर करणार आहेत.
यादिवशी होणार 'शमशेरा' प्रदर्शीत
रणवीर कपूर, वाणी कपूर आणि संजय दत्तची जोडी लवकरच मोठ्या पडद्यावर दिसून येणार आहे. या चित्रपटात तिघेही एकत्र दिसणार
आहेत. हा चित्रपट 18 मार्च,2022 ला प्रदर्शीत होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण मल्होत्रा करणार आहेत.