एक्स्प्लोर

World Mental Health Day 2022 : ‘तारे जमीन पर’ ते ‘तमाशा’, बॉलिवूडच्या ‘या’ चित्रपटांनीही केलं मानसिक आरोग्यवर भाष्य

Movies Based On Mental health : समस्या कोणतीही असो, चित्रपटाच्या माध्यमातून त्याविषयी सहज जनजागृती निर्माण करता येते. आजकाल मेंटल हेल्थ इश्यूवर भाष्य करणारेही खूप चित्रपट बनवले जात आहेत.

Movies Based On Mental health : चित्रपटांचा जनमानसावर होणारा परिणाम मोठा आहे. अनेक सामाजिक प्रश्न मांडण्यासाठीही चित्रपटांचा प्रभावी वापर केला जातो. त्यामुळे समाजात जागरूकता वाढते. सध्या विविध सामाजिक विषयांवरचे चित्रपट पाहायला मिळतात. समस्या कोणतीही असो, चित्रपटाच्या माध्यमातून त्याविषयी सहज जनजागृती निर्माण करता येते. आजकाल मेंटल हेल्थ इश्यूवर (World Mental Health Day 2022 ) भाष्य करणारेही खूप चित्रपट बनवले जात आहेत, ज्यांनी मानसिक आरोग्याविषयी समाजात जनजागृती केली. तासेक, हा सर्वांगीण आरोग्याचाही एक भाग आहे आणि शारीरिक आरोग्याइतकाच महत्त्वाचा आहे हे लोकांना समजावून सांगितले. अनेक कलाकारांनी अशा विषयातील चित्रपटांमध्ये अतिशय उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. चला तर, जाणून घेऊया अशाच काही चित्रपटांबद्दल...

तारे जमीन पर

बॉलिवूड अभिनेता आमिर खान याचा 'तारे जमीन पर' हा असा चित्रपट आहे, ज्याला आजपर्यंत कोणताही चित्रपट टक्कर देऊ शकत नाही. ‘तारे जमीन पर’ची कथा मानसिकदृष्ट्या अक्षम असलेल्या आणि डिस्लेक्सिया नावाचा आजार असलेल्या मुलाभोवती फिरते. या आजारात मुलाला लिहिणे-वाचण्यात अडचण येते. त्याला शब्द आणि संख्या यांच्याशी सतत झगडावे लागते. त्याच्या या समस्येकडे दुर्लक्ष करून त्याच्यावर अपेक्षांचं ओझं लादलं जातं. या दरम्यान त्याला कधी शिवीगाळ, कधी मारहाण तर कधी अपमानाला सामोरे जावे लागते. 8-10 वर्षांचा हा मुलगा कोणकोणत्या परिस्थितीला समोरा जाते, या विषयावर हा चित्रपट भाष्य करतो.

डियर जिंदगी

अभिनेता शाहरुख खान आणि आलिया भट्ट यांचा ‘डिअर जिंदगी’ हा चित्रपट मानसिक आणि भावनिक आरोग्यावर भाष्य करणारा आहे. या चित्रपटात आलिया मुख्य भूमिकेत आहे, जी तिच्या ब्रेकअपनंतर खूप मानसिक तणावाला सामोरी जात असते. यामुळे, ती थेरपिस्टकडे जाण्याचा निर्णय घेते. ज्याची व्यक्तिरेखा शाहरुखने साकारली आहे. शाहरुख तिला या तणावावर मात करण्यास मदत करतो. या चित्रपटाने अनेकांना त्यांच्या मानसिक आणि भावनिक आरोग्याबद्दल मोकळेपणाने बोलण्याची प्रेरणा दिली.

छिछोरे

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत, अभिनेत्री श्रद्धा कपूर स्टारर ‘छिछोरे’ या चित्रपटात परीक्षेतील चिंता, दबाव आणि आत्महत्या या गोष्टी अतिशय बोलक्या पद्धतीने दाखवल्या आहेत. परीक्षेच्या दबावामुळे एक मुलगा कसा आत्महत्येचा प्रयत्न करतो, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. नापास होण्याच्या भीतीने हे सर्व घडते. विद्यार्थी नापास होण्याच्या भीतीने तणावात असतात आणि त्यातून या घटना घडतात. सर्वांनाच हा चित्रपट खूप आवडला होता.

अतरंगी रे

अभिनेता अक्षय कुमार, धनुष आणि अभिनेत्री सारा अली खान अभिनित ‘अतरंगी रे’ चित्रपटामध्ये रिंकू नावाचे पात्र दाखवले आहे, जे एका काल्पनिक व्यक्तीशी संवाद साधते. सारा अली खानने ही व्यक्तिरेखा अतिशय सुंदर साकारली आहे. या मुलीला स्किझोफ्रेनिया नावाचा आजार आहे. मात्र, यावर ती कशी मात करते आणि यात तिला आजुबाजुंचे लोक कशी मदत करतात, याची कथा दाखवण्यात आली आहे.

तमाशा

‘तमाशा’ हा चित्रपट बॉर्डरलाइन पर्सनॅलिटी डिसऑर्डरनेग्रस्त तरूणाभोवती फिरतो. या विकाराने त्रस्त असणाऱ्या माणसाच्या आयुष्यात कशी उलथापालथ होते, ते दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात आपल्या खऱ्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेणाऱ्या रणबीरला त्याच्या मैत्रिणीची भूमिका करणारी दीपिका या समस्येवर मात करण्यासाठी मदत करते. ‘तमाशा’ चित्रपटातील गाणी आणि इम्तियाज अलीच्या दिग्दर्शनामुळे या चित्रपटाला अनेकांनी पसंती दिली होती.

हेही वाचा :

World Mental Health Day 2022 : मानसिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करणारा 'जागतिक मानसिक आरोग्य दिन'; वाचा इतिहास आणि महत्त्व

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
Embed widget