![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Sayali Sanjeev : फेटा अन् भरजरी पैठणी, मराठमोळ्या लूकमध्ये बाईकवर स्वार झाल्या महिला ; 'गोष्ट एका पैठणीची'चं हटके प्रमोशन
Sayali Sanjeev : 'गोष्ट एका पैठणीची' या सिनेमाच्या निमित्ताने दादरमध्ये नुकतीच बाईक रॅली काढण्यात आली होती.
![Sayali Sanjeev : फेटा अन् भरजरी पैठणी, मराठमोळ्या लूकमध्ये बाईकवर स्वार झाल्या महिला ; 'गोष्ट एका पैठणीची'चं हटके प्रमोशन Women riding bikes in Marathi look promotion of Goshta Eka Paithanichi marathi movie Sayali Sanjeev : फेटा अन् भरजरी पैठणी, मराठमोळ्या लूकमध्ये बाईकवर स्वार झाल्या महिला ; 'गोष्ट एका पैठणीची'चं हटके प्रमोशन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/04/d234d3b947401e803699483f70360ebf1670133959385254_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sayali Sanjeev On Goshta Eka Paithanichi : 'गोष्ट एका पैठणीची' (Goshta Eka Paithanichi) हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी दादरमध्ये खास बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. भरजरी पैठणी, मराठमोळा साजश्रृंगार करुन बाईकस्वारी करायला निघालेल्या महिलांनी शनिवारी दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क परिसर दुमदुमला होता.
बाईक रॅलीमध्ये 'गोष्ट एका पैठणीची' या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत असलेल्या सायली संजीवचादेखील सहभाग होता. मराठी बाणा आणि त्याला लाभलेली साहसाची जोड उपस्थितांना प्रोत्साहन देणारी होती. त्यामुळे रॅलीला सोहळ्याचे स्वरुप आले होते. दरम्यान बाईकस्वार महिलांना पैठणीने गौरवण्यात आले आहे.
View this post on Instagram
बाईक रॅलीत सहभागी झालेली सायली म्हणाली,"माझ्या मैत्रिणींचं माझ्यावरचं प्रेम पाहून खरंच खूप छान वाटलं. हा क्षण माझ्यासाठी खूप खास आहे. वेळात वेळ काढून माझ्या मैत्रिणी बाईक रॅलीत सहभागी झाल्याबद्दल त्यांचे आभार. प्रेक्षकांचं हे प्रेम आम्हाला सकारात्मक ऊर्जा देणारे आहे".
बाईक रॅलीत अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. सहभागी महिलांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. महिलांनी आपली आवड जपावी, आपली स्वप्नं जगावी या हेतूने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
'गोष्ट एका पैठणीची' हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सिनेमा आता सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमात सायलीसह, सुव्रत जोशी, मृणाल कुलकर्णी, सुहिता थत्ते, मिलिंद गुणाजी, मधुरा वेलणकर, गिरीजा ओक, अदिती द्रविड महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
संबंधित बातम्या
Ruturaj Gaikwad: "मॅच बघितली का वहिनी? काय बॅटिंग केलीये..."; ऋतुराजच्या 7 षटकारांनंतर नेटकऱ्यांच्या सायलीच्या फोटोंवर कमेंट्स
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)