Shah Rukh Khan : प्रत्येक इफ्तारला हजर राहणारा शाहरुख बाबा सिद्दीकींच्या अंत्यदर्शनाला का गैरहजर होता? समोर आलं मोठं कारण
Shah Rukh Khan : शाहरुख खान बाबा सिद्दीकींच्या अंत्यदर्शनाला शाहरुख का गैरहजर होता याचं महत्त्वाचं कारण आता समोर आलं आहे.
Shah Rukh Khan Absent at Baba Siddique Funeral : बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्या हत्येनंतर बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबादारी बिष्णोई गँगने स्वीकारली आहे. तसेच या हत्येचा थेट संबंध सलमान खानशी (Salman Khan) जोडण्यात आलाय. बिष्णोई गँगच्या एका कथित फेसबुक पोस्टमध्येही असंच सांगण्यात आलंय. पण असं असलं तरीही बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खान हताश झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्या अत्यंदर्शनावेळी सलमानला अश्रूही अनावर झाले होते. अनेक सेलिब्रेटींनी बाबा सिद्दीकी यांच्या अत्यंदर्शनाला हजेरीही लावली होती. पण या सगळ्यामध्ये एक नाव गैरहजर होतं.
अभिनेता शाहरुख खान हा बाबा सिद्दीकी यांच्या अंत्यदर्शनाला गैरहजर होता. त्यामुळे त्याच्या गैरहजेरीविषयी सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु होती. त्यातच आता शाहरुख बाबा सिद्दीकी यांच्या अंत्यदर्शनाच्या विधीला गैरहजर का होता याचं कारण समोर आलेलं आहे.
शाहरुख का होता गैरहजर?
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर शाहरुख खानची कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. शाहरुख बाबा सिद्दीकींच्या प्रत्येक इफ्तारला हजर असायचा. त्यामुळे तो अंत्यदर्शनाला का गैरहजर होता असा प्रश्न अनेकांना पडला. टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, शाहरुखच्या एका जवळच्या व्यक्तीने यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्या व्यक्तीने म्हटलं की, शाहरुखला बाबा सिद्दीकींची हत्या झाल्यापासून या सगळ्यापासून दूर राहायचं आहे. बाबा सिद्दीकींच्या हत्येचं प्रकरण हे थेट सलमान खानसोबत जोडण्यात आलं आणि शाहरुखला हे नको होतं.
पुढे त्या व्यक्तीने म्हटलं की, अशा कोणत्याही प्रकारच्या वादात येऊ नये यासाठी शाहरुखने बाबा सिद्दीकींच्या अत्यंदर्शनालाही येणं टाळलं. त्याचप्रमाणे या हत्या प्रकरणात कुठेही आपलं नाव येऊ नये, यासाठी शाहरुख या सगळ्यापासून लांब राहिला आहे. लॉरेन्स बिष्णोईचं काम पाहाता, अशा कोणत्याही गोष्टीमध्ये शाहरुखला अडकायचं नाहीये. म्हणून असल्या कोणत्याही वादापासून वाचण्यासाठी शाहरुख बाबा सिद्दीकींच्या अंत्यदर्शनाला गैरहजर होता.