Aamir Khan : 'लाल सिंह चड्ढा' पुन्हा का करावा वाटला? जाणून घ्या काय म्हणाला आमिर
Aamir Khan : 'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एबीपी माझाच्या 'हार्ट टू हार्ट' या खास कार्यक्रमात आमिरने 'लाल सिंह चड्ढा' संदर्भात अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे.
Aamir Khan : 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच चर्चेत आला आहे. 'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा. लालची गोष्ट प्रेक्षकांना कळावी हा या सिनेमामागचा उद्देश होता, असे मत एबीपी माझाच्या 'हार्ट टू हार्ट' या खास कार्यक्रमात आमिरने मांडले आहे.
आमिरला 'लाल सिंह चड्ढा' का करावा वाटला?
आमिर 'लाल सिंह चड्ढा' का करावा वाटला हे सांगताना म्हणाला,"90 च्या दशकात मी 'फॉरेस्ट गंप' हा सिनेमा पाहिला होता. 14 वर्षांपूर्वी अतुल कुलकर्णीने 'लाल सिंह चड्ढा' या सिनेमाची संहिता लिहिली. अतुलने 'लाल सिंह चड्ढा'ची संहिता लिहिल्यानंतर मी त्याला या सिनेमासाठी नकार दिला होता. त्यानंतर दोन वर्षांनी अतुलच्या सांगण्यानुसार मी पुन्हा या सिनेमाची संहिता वाचली. मला 'लाल सिंह चड्ढा'चे कथानक खूप आवडले. 'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा. लालची गोष्ट प्रेक्षकांना कळावी हा या सिनेमामागचा उद्देश होता. त्यामुळे या सिनेमावर काम करण्याचा मी निर्णय घेतला.
आमिर पुढे म्हणाला, 'लाल सिंह चड्ढा' या सिनेमाच्या हिरोकडे असलेली शक्ती त्याची निरागसता आहे. त्यामुळे हा सिनेमा मला भावला. तरुण मंडळींसाठी हा सिनेमा प्रेरणादायी ठरेल असे मला वाटते. निरागसतेत असलेली ताकद प्रेक्षकांना कळावी हा या सिनेमामागचा उद्देश आहे. 'फॉरेस्ट गंप' भारतीय प्रेक्षकांनी पाहिलेला नाही. 'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा 'फॉरेस्ट गंप'चा रिमेक असल्याने प्रेक्षक हा सिनेमा पाहायला लागले आहेत. 'फॉरेस्ट गंप' हा सिनेमा फार कमी प्रेक्षकांनी पाहिलेला आहे".
'लाल सिंह चड्ढा' पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये सकारात्मकता येईल : आमिर खान
'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये सकारात्मकता येईल. प्रत्येक माणसाच्या चांगल्या वाईट बाजू असतात. काही माणसं संवेदनशील असतात. तर काही रागीट. पण हा सिनेमा पाहिल्यानंतर प्रत्येक माणूस सकारात्मक होतो, असे मत आमिर खानने मांडले आहे.
संबंधित बातम्या