राजीव यांच्यावरील मोदींच्या आरोपांना काँग्रेसचा 'राजीव'च्या फोटोंनी प्रतिप्रश्न
राजीव गांधी आपल्या सासरच्या मंडळींसोबत आयएनएस विराट या युद्धनौकेवरुन सुट्टीवर गेले होते. दहा दिवस सर्व जण एका बेटावर राहिले. तिथे युद्धनौकेवरील कर्मचारीवर्ग त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात होता. हा देशाच्या सुरक्षेसोबत खेळ नाही का?' असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील प्रचारसभेत विचारला होता.
![राजीव यांच्यावरील मोदींच्या आरोपांना काँग्रेसचा 'राजीव'च्या फोटोंनी प्रतिप्रश्न When foreigner Akshay Kumar was on board INS Sumitra with Narendra Modi, Congress shares photos, Divya Spandana राजीव यांच्यावरील मोदींच्या आरोपांना काँग्रेसचा 'राजीव'च्या फोटोंनी प्रतिप्रश्न](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/05/10174432/Akshay-Kumar.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
भारताचं सर्वात मोठं लष्करी प्रदर्शन फेब्रुवारी 2016 मध्ये विशाखापट्टणममधील इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू या लष्करी प्रादर्शनात वरिष्ठ अधिकारी आणि व्हीव्हीआयपींसह अभिनेता अक्षय कुमारने मुलगा आर्यनसोबत हजेरी लावली होती. 15 वर्षांतील हे भारताचं सर्वात मोठं लष्करी शक्तीप्रदर्शन होतं. यावेळी भारताची आयएनएस सुमित्रा ही युद्धनौका आयएफआरमध्ये सहभागी झाली होती. निवृत्तीनंतर मी कॅनडामध्ये स्थायिक होणार, अक्षय कुमारचा जुना व्हिडीओ व्हायरल राजीव गांधींनी युद्धनौकेचा अपमान केला दिल्लीतील सभेत नरेंद्र मोदी 8 मे रोजी म्हणाले होते की, "गांधी कुटुंबाने आयएनएस विराटचा पर्सनल टॅक्सीप्रमाणे वापर केला होता, युद्धनौकेचा अपमान केला होता. राजीव गांधी पंतप्रधान असतानाची ही गोष्ट आहे. एका बेटावर सुट्टी साजरी करण्यासाठी युद्धनौकेचा दहा दिवस वापर केला होता. बेटावरील सर्व व्यवस्थेची जबाबदारी सरकार आणि नौदलावर सोपवली होती. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सासरची मंडळीही होती. काँग्रेसच्या या कुटुंबाने जनपथलाही दलालपथ बनवलं." पंतप्रधान मोदी 1987 मधील राजीव गांधी यांच्या 1987 मधील लक्षद्वीपमधील एका बेटाच्या प्रवासाचा उल्लेख करत होते. तो सरकारी दौरा होता : माजी नौदल अधिकारी पण राजीव गांधी यांचा लक्षद्वीप दौरा हा सरकारी कामकाजाचा भाग असल्याचं जाहीर करुन माजी नौदल अधिकाऱ्यांनी नरेंद्र मोदींनाच खोटं पाडलं. माजी नौदल प्रमुख अॅडमिरल एल रामदास यांनी यासंदर्भात एक परिपत्रक जारी केलं आहे. राजीव गांधींच्या लक्षद्वीप भेटीदरम्यान एल रामदास हे दक्षिण विभागाचे प्रमुख होते. "ज्या घटनेचा उल्लेख राजीव गांधी कुटुंबीयांसोबत सुट्टीसाठी गेले होते, असा केला जात आहे, खरंतर तो त्यांचा सरकारी दौरा होता. ते तिथे लाडू-पेढे वाटायला गेले नव्हते. राजीव गांधी यांच्यासोबत आयएनएस विराटवर कोणताही परदेशी नागरिक नव्हता," असं एल रामदास यांनी सांगितलं.Yeh teek tha? @narendramodi you took a Canadian citizen @akshaykumar with you on-board INS Sumitra. #SabseBadaJhootaModi Here’s the link to the article, most of us have not forgotten this controversy : https://t.co/jrPNUvk2Py pic.twitter.com/SWkl78rA4F
— Divya Spandana/Ramya (@divyaspandana) May 9, 2019
तर राजीव गांधींचा आयएनएस विराटचा प्रवास सरकारी होता. ही कोणत्याही प्रकारची पिकनिक नव्हती, असा दावा व्हाईस अॅडमिरल विनोद पसरिचा यांनी केला आहे. संबंधित बातम्या कॅनडियन नागरिक अक्षय कुमारकडून राष्ट्रीय पुरस्कार परत घेतला जाणार?Admiral L Ramdas also clears the air on Rajiv Gandhiji’s trip to Lakshadweep. Now can the PrimeLiar @narendramodi and everybody else who lied and defamed him & the army please apologise? Or is it too much to expect from uncouth people? #SabseBadaJhootaModi pic.twitter.com/qbrPez4LSM
— Divya Spandana/Ramya (@divyaspandana) May 9, 2019
देशभक्ती सिद्ध करण्याची गरज नाही, कॅनेडियन नागरिकत्त्वाच्या वादावर अक्षय कुमारनं मौन सोडलं
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)