एक्स्प्लोर
Advertisement
काश्मीरात हे काय सुरु आहे? कलम 370 हटवल्यानंतर गौहर खानची संतप्त प्रतिक्रिया, नेटीजन्स भडकले
भारताच्या इतिहासातील अतिशय महत्त्वाची अशी घोषणा आज संसदेत करण्यात आली. गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत सादर केलेल्या निवेदनात कलम 370 हटवण्याबाबतची माहिती दिली.
मुंबई : भारताच्या इतिहासातील अतिशय महत्त्वाची अशी घोषणा आज संसदेत करण्यात आली. गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत सादर केलेल्या निवेदनात कलम 370 हटवण्याबाबतची माहिती दिली. यासोबत जम्मू काश्मीर राज्याची पुनर्रचना करण्याबाबतचा प्रस्तावही त्यांनी मांडला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर नेटीजन्सनी केंद्र सरकार, पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्यामध्ये बॉलिवूडकरही मागे नव्हते. परंतु हिंदी टीव्ही अभिनेत्री गौहर खानने मात्र यावर नाराजी व्यक्त केली आहे.
काश्मीरमध्ये फुटीरतावादी नेते, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लाह, माजी मुख्यमंत्री महबुबा मुफ्तींना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. याबाबत ओमर अब्दुल्लाह यांनी ट्विटरद्वारे संताप व्यक्त केला होता. गौहरने खानने अब्दुल्लाह यांचे ट्वीट रीट्विट करत म्हटले की, "काश्मीरमध्ये हे सर्व काय सुरु आहे? अल्लाह सर्वांना सुरक्षित ठेवेल, अशी अपेक्षा आहे."
अनेक नेटीजन्सना काश्मीरबाबत होत असलेले बदल गौहरला आवडले नसल्याचे गौहरच्या ट्वीटमध्ये जाणवले. त्यामुळे त्यांनी ट्वीटरवरील कमेंट्समध्ये तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
गौहर खाननंतर टीव्ही अभिनेत्री श्रुती सेठ हिनेदेखील ट्वीट करुन वाद ओढवून घेतला आहे. श्रुती सेठने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "क्या हालत हो गई इन्सान की, अब जन्नत से भी तकलीफ है?"What the hell us happening ??? May Allah keep every one safe ! In Kashmir https://t.co/bVicpsYOO7
— Gauahar Khan (@GAUAHAR_KHAN) August 5, 2019
'दंगल'फेम अभिनेत्री झायरा वासीमनेदेखील याबाबत ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. झायराने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ही वेळही निघून जाईल. धर्माचे कारण देत झायराने काही दिवसांपूर्वी बॉलिवूडला अलविदा केला आहे.Kya haalat ho gayi hain insaan ki, Ab jannat se bhi takleef hain?
— Shruti Seth (@SethShruti) August 5, 2019
कलम 370 हटवल्याने काय बदल होणार? आज काश्मीरसांबंधी तीन मोठे निर्णय | ABP Majha 'कलम 35अ' काय आहे? हे कलम हटवल्यास कोणते बदल होणार?This too shall pass! #Kashmir
— Zaira Wasim (@ZairaWasimmm) August 4, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement