(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तुमचा विकेण्ड अधिक खास करायचा आहे? तर मग ओटीटीवर 'हे' चित्रपट पहाच...
यंदाचा विकेण्ड प्रेक्षकांसाठी अधिकच खास असणार आहे. कारण ओटीटी विश्वात मनोरंजनाच्या अनेक गोष्टी उपलब्ध आहेत.
दिवाळीतला हा विकेण्ड प्रेक्षकांसाठी मनोंजनाचा धमाका घेऊन आला आहे. एकीकडे सिनेमागृहात अक्षय कुमारचा 'सूर्यवंशी' सिनेमा धुमाकुळ घालत आहे. तर दुसरीकडे ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील मनोरंजनाची मेजवानी आहे. 'मीनाक्षी सुंदरेश्वर'सह सूर्याच्या 'जय भीम' सिनेमापर्यंत ओटीटीवर बऱ्याच गोष्टी उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना घरबसल्या चांगल्या सिनेमांचा आस्वाद घेता येणार आहे.
Meenakshi Sundareshwar: सान्या मल्होत्रा आणि अभिमन्यू दासानीचा 'मीनाक्षी सुंदरेश्वर' हा सिनेमा आहे. हा सिनेमा पती-पत्नीच्या नात्यावर भाष्य करतो. सुंदरेश्वरला कामानिमित्ताने बंगळुरुला जावे लागते. त्यामुळे मीनाक्षीला सासरी एकटीला राहावे लागते.
Love Hard: 'लव हार्ड' या सिनेमाचे दिग्दर्शन हर्बाब जिमेनेज यांनी केले आहे. हा रोमॅंटिक विनोदी सिनेमा आहे.
Jai Bhim: 'जय भीम' हा 1993 सालातील सत्य घटनेवर आधारित सिनेमा आहे. या सिनेमात सूर्याने वकिलाचे पात्र साकारले आहे. सिनेमात प्रकाश राज, राजिशा विजयन, लिजोमोल जोस, राव रमेश दिसून आले आहेत.
ब्राझीलमधील लोकप्रिय गायिका Marilia Mendonca चा विमान अपघातात मृत्यू, वयाच्या 26 व्या वर्षी गमावला जीव
MGR Magan: 'एमजीआर मगन' सिनेमाचे लेखन, दिग्दर्शन पोनरामने केले आहे. हा कौटुंबिक नात्यावर भाष्य करणारा सिनेमा आहे. या सिनेमात शशिकुमार, सत्यराज, मिरनलिनी रवी आणि समुथिरकानी मुख्य भूमिकेत आहेत. सिनेमा वडील-मुलाच्या नाते दाखवण्यात आले आहे.
Akkad Bakkad Rafu Chakkar: 'अक्कड बक्कड रफू चक्कर' या सिनेमात भार्गव आणि सिद्धांत अशा दोन मित्रांचे कथानक दाखवण्यात आले आहे. सिनेमात अनेक नाट्यमय वळणे आहेत.