एक्स्प्लोर

Waheeda Rehman: ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रेहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर; अनुराग ठाकूर यांनी ट्वीट शेअर करुन दिली माहिती

Waheeda Rehman: वहीदा रहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अनुराग ठाकूर यांनी ट्वीट शेअर करुन ही घोषणा केली आहे.

Waheeda Rehman: ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रेहमान (Waheeda Rehman) यांना या वर्षाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी ही घोषणा केली आहे. अनुराग ठाकूर यांनी एक ट्वीच शेअर केले आहे. या ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा केली आहे.

अनुराग ठाकूर यांचे ट्वीट

अनुराग ठाकूर यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, "वहीदा रेहमान यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल यावर्षीचा प्रतिष्ठित दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. हे जाहीर करताना मला खूप आनंद आणि सन्मानाची भावना आहे. वहीदा रेहमान  यांच्या हिंदी चित्रपटांमधील भूमिकांची समीक्षकांनी प्रशंसा केली आहे. त्यापैकी प्यासा, कागज के फूल, चौधवी का चाँद, साहेब बीवी और गुलाम,  खामोशी आणि इतर अनेक चित्रपट आहेत.  5 दशकांहून अधिक काळाच्या त्यांच्या कारकिर्दीत, त्यांनी अनेक भूमिका अत्यंत चोखंदळपणे साकारल्या आहेत. रेश्मा आणि शेरा या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारप्राप्त, वहीदा जी यांनी समर्पण, वचनबद्धता आणि एका भारतीय नारीच्या सामर्थ्याचे उदाहरण दिले आहे."

"मी त्यांचे अभिनंदन करतो आणि  त्यांच्या समृद्ध कार्याला नम्रपणे अभिवादन करतो जे  चित्रपटाच्या इतिहासाचा एक अंगभूत भाग आहे." असंही त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे.

गेल्या वर्षी आशा पारेख यांना दादासाबेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आता यंदाचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार वहीदा रहमान यांना जाहीर करण्यात आला आहे.

वहीदा रहमान यांचे चित्रपट

वहीदा रहमान यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. वहीदा रहमान यांनी डान्सर म्हणून अलिबाबावम 40 थिरुदरगलम या तमिळ चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले. एक फूल चार काँटे, चाँदनी,दिल्ली 6,बीस साल बाद या चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिकेचे अनेकांनी कौतुक केले.  

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Dada Saheb Phalke Award : देविका रानी यांना मिळाला पहिला 'दादासाबेब फाळके पुरस्कार'; जाणून घ्या संपूर्ण यादी...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Govinda Gun Fire : कोलकात्याला जाण्यासाठी बॅगेत बंदूक भरताना मिसफायरShinde Group Dasara Melava : शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होणारDevendra Fadnavis : लव्ह जिहादच्या तब्बल एक लाखांपेक्षा जास्त तक्रारी - देवेंद्र फडणवीसTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2PM : 1 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
Embed widget