एक्स्प्लोर

Vivek Agnihotri : 'द काश्मीर फाइल्स'मधून कमावलेले पैसे कुठे खर्च केले? विवेक अग्निहोत्री म्हणाले...

Vivek Agnihotri : काश्मीर फाइल्समधून कमावलेले पैसे कुठे खर्च केले? याबद्दल विवेक अग्निहोत्रींनी भाष्य केलं आहे.

Vivek Agnihotri Became Bankrupt : सिने-निर्माता विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. 15 ते 25 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये निर्मिती करण्यात आलेल्या या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 3.55 कोटी रुपयांची कमाई केली. तर भारतात या सिनेमाने 250 कोटींपेक्षा अधिक कमाई केली.

'द काश्मीर फाइल्स' या सिनेमाच्या माध्यमातून चांगले पैसे कमावल्यानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे की,'द कश्मीर फाइल्स' या सिनेमाच्या माध्यमातून मिळालेले पैसे पुढच्या सिनेमाच्या निर्मितीसाठी खर्च झाले आहेत. त्यामुळे आता तिसरा सिनेमा बनवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागणार आहे.

हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना विवेक अग्निहोत्री म्हणाले की,"मी जे काही पैसे कमावले, ते मी माझ्या पुढच्या 'द व्हॅक्सिन वॉर' या सिनेमावर खर्च केले आहेत. त्यामुळे सिनेमाच्या दणदणीत कमाईचा मला फारसा फायदा झालेला नाही. 

'द कश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड' प्रेक्षकांच्या भेटीला!

विवेक अग्निहोत्रींची 'द कश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड' ही सीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सात भागांची ही सीरिज प्रेक्षक झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. अग्निहोत्री यांचा काश्मिर फाईल्स हा सिनेमा 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यात काश्मिरी पंडितांचे स्थलांतर, त्यांना करावा लागलेला संघर्ष आणि त्यांच्या वाटेला आलेला अपमान याविषयीचे विदारक चित्रण करण्यात आले होते. देशभरातून काश्मिर फाईल्सला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. त्यावरुनही वादही तेवढ्याच प्रमाणात झाला होता. सध्या 'द कश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड' ही सीरिज चर्चेत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri)

'द वॅक्सीन वॉर' 15 ऑगस्टला येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

विवेक अग्निहोत्रीचा 'द वॅक्सीन वॉर' हा सिनेमा 15 ऑगस्ट 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारताने लढलेल्या युद्धाची एक अविश्वसनीय कथा या सिनेमात दाखवण्यात आली आहे. 11 भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटात कांतारा फेम अभिनेत्री सप्तमी गौडा ही प्रमुख भूमिका साकारणार आहे. या बहुचर्चित सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

संबंधित बातम्या

Vivek Agnihotri : 'द कश्मीर फाइल्स'नंतर आता विवेक अग्निहोत्रींची मोठी घोषणा; 'द कश्मीर फाइल्स'चा पुढील भाग लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget