Vithala Tuch : 'तूच माझा प्राण सखा..तूच माझा पाठीराखा..!; 'विठ्ठला तूच' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Vithala Tuch : प्रेमाचा आविष्कार घेऊन 'विठ्ठला तूच' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Vithala Tuch : सध्या सर्वत्र विठ्ठलमय वातावरण आहे. विठ्ठल सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. या विठ्ठलाप्रमाणेच प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणाऱ्या विठ्ठल शिंदेंचा खडतर प्रवास 'विठ्ठला तूच' (Vithala Tuch) या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'विठ्ठला तूच'च्या माध्यमातून योगेश जम्मा करणार सिनेसृष्टीत पदार्पण
विठ्ठला तूच असे आपण जेव्हा आपल्या विठ्ठलाला म्हणतो तसे या सिनेमातील नायकालादेखील कथेने विठ्ठला तूच असे म्हणायला भाग पाडले आहे. तूच माझा प्राण सखा..तूच माझा पाठीराखा..! अशी टॅगलाईन असलेल्या या सिनेमाचे पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या सिनेमात योगेश जम्मा मुख्य भूमिकेत आहे. योगेच या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.
'विठ्ठला तूच' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा प्रफुल्ल म्हस्केने सांभाळली आहे. या सिनेमाचे कथानक रोमॅंटिक आहे. या सिनेमात विठ्ठला म्हणजेच योगेशचा एकंदरीत प्रवास, आणि त्या दरम्यान जुळून आलेलं त्याचं प्रेम आणि त्यानंतर जुळलेल्या प्रेमाचा प्रवास प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
योगेशचा रावडी लूक
'विठ्ठला तूच' या सिनेमाच्या पोस्टरमध्ये प्रेक्षकांना योगेशचा रावडी लूक पाहायला मिळत आहे. या सिनेमात प्रेक्षकांना गावरान प्रेमाचा माहोल पाहायला मिळणार आहे. तसेच सिनेमातील दमदार गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतील. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून मराठी सिनेसृष्टीत ऐतिहासिक सिनेमांचा दबदबा पाहायला मिळत आहे. अशातच 'विठ्ठला तूच' हा रोमॅंटिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. या सिनेमात आणखी कोणते कलाकार असणार हे लवकरच प्रेक्षकांना कळणार आहे. पोस्टर प्रदर्शित झाल्यामुळे प्रेक्षक सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.
संबंधित बातम्या