Sharad Ponkshe : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सावरकरांना मानवंदना, हे चित्र आम्हा हिंदूंना सुखावणारं : शरद पोंक्षे
Sharad Ponkshe : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट दिली आहे.
Sharad Ponkshe : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सध्या मुंबईतील विविध ठिकाणी भेटी देत आहेत. भर पावसात एकनाथ शिंदे मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट झाले. मंगळवारी एकनाथ शिंदेंनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर एकनाथ शिदेंनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. यासंदर्भात अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी खास पोस्ट शेअर केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी नुकतीच स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट दिली आहे. एकनाथ शिंदेंचा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला अभिवादन करतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यासंदर्भात अभिनेते शरद पोंक्षे यांनी एक खास पोस्ट लिहिली आहे.
View this post on Instagram
शरद पोंक्षेंनी लिहिलं आहे,"मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे सावरकरांना मानवंदना देण्यासाठी गेले. हे चित्र आम्हा हिंदूंना सुखावणार आहे". या पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. याआधीदेखील शरद पोंक्षे यांनी "मोठ्या भावासारखे माझ्या पाठीशी खंबीरपणे ऊभे राहीले!" असं म्हणत एकनाथ शिंदेंसाठी खास पोस्ट शेअर केली होती.
शरद पोंक्षे यांनी अनेक सिनेमे, मालिका आणि नाटकांमधून काम केलं आहे. आपल्या दमदार अभिनयाने ते प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करतात. केवळ अभिनयच नाही तर, आपल्या बेधडक मतांसाठीदेखील ते नेहमी चर्चेत असतात. सध्या ते 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेत काम करत आहेत. त्यांची 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकातील नथुरामची भूमिका प्रचंड गाजली होती.
संबंधित बातम्या