Virat-Anushka : विरुष्काचा नामांकित स्पोर्ट्स वेअर ब्रॅंडसोबत वाद; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
Virat Kohli Anushka Sharma : क्रिकेटपटू विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा एका वादात अडकले आहेत.
Virat Kohli - Anushka Sharma Sportswear Brand Controversy : क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आता हे दोघे 'पुमा' या स्पोर्ट्स वेअर ब्रॅंडमुळे चर्चेत आहेत.
'पुमा' (Puma) या स्पोर्ट्स वेअर ब्रॅंडने अनुष्काची परवानगी न घेता तिचे काही फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले. ही गोष्ट अनुष्काच्या निदर्शनास आल्यानंतर तिने आपला संपात व्यक्त करत त्या कंपनीला ते फोटो हटवायला सांगितले. अखेर अनुष्काचा संताप पाहून विराटने मध्यस्ती करत हे प्रकरण मिटवलं.
No way Kohli posting this after liking this post by Puma 😭🖐 pic.twitter.com/gIZzsnsoN4
— feryy (@ffspari) December 19, 2022
So here's the official announcement. Anushka Sharma will be the brand ambassador of Puma 👀 pic.twitter.com/1CWQFSyjJv
— feryy (@ffspari) December 19, 2022
नेमकं प्रकरण काय?
'पुमा' या स्पोर्ट्स वेअर ब्रॅंडने एका जाहिरातीसाठी अनुष्काला न विचारता तिची परवानगी न घेता त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंवर अनुष्काचे फोटो शेअर केले. हा फोटो पाहिल्यानंतर अनुष्का भडकली. तिने तिच्या इंस्टा स्टोरीवर तो फोटो शेअर करत लिहिलं आहे,"पुमा इंडिया तुम्हाला नक्कीच माहिती असेल, पब्लिसिटीसाठी एखाद्याचा फोटो वापरण्याआधी त्या संबंधित व्यक्तीची परवानगी घेणं आवश्यक आहे. मी तुमची ब्रॅंड अॅम्बेसेडर नाही. त्यामुळे हा फोटो काढून टाकावा".
अनुष्काचीही पोस्ट पाहिल्यानंतर विराटने मध्यस्ती केली आहे. त्याने लवकरात लवकर ही समलस्या सोडवा असं म्हटलं आहे. यावर पुमा इंडियाने म्हटले आहे,"आम्ही तुझ्यासोबत आधीच संपर्क साधायला हवा होता. आता ही गोष्ट इथेच थांबवूया".
View this post on Instagram
संबंधित बातम्या