एक्स्प्लोर
'मान्यवर' च्या जाहिरातीत 'विरानुष्का'ची केमिस्ट्री
'मान्यवर'साठीच्या या जाहिरातीत विराट कोहली आणि अनुष्का शर्माची केमिस्ट्री लोकांना पाहायला मिळते आहे.
मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्र अनुष्का शर्मा यांची नवी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरात यूट्यूबवर अपलोड होताच अर्ध्या तासात 5 हजारांहून जास्त व्ह्यूज या जाहिरातीला मिळाले आहेत.
'मान्यवर'साठीच्या या जाहिरातीत विराट कोहली आणि अनुष्का शर्माची केमिस्ट्री लोकांना पाहायला मिळते आहे. दोघंही रिलेशिनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आजवर ऐकायला मिळत होत्या. मात्र आता पॅन्टीनच्या जाहिरातीनंतर पुन्हा ही जोडी एकत्र आल्यानं चर्चांनाही उधाण आलं आहे.
कधी क्रिकेटची मॅच पाहण्यासाठी अनुष्का आवर्जून हजर राहायची, तर कधी अनुष्काच्या सिनेमाच्या प्रीमियरसाठी विराट हजर राहायचा. आता दोघेही एकाच जाहिरातीत दिसत आहेत. तेही विवाहसोहळ्याच्या सीनमध्ये. खऱ्या आयुष्यात विराट आणि अनुष्का कधी एकत्र होतील, याची उत्सुकता दोघांच्याही चाहत्यांना आहेच. तोवर जाहिरातीच्या माध्यमातून एकत्र आल्याने दोघांच्याही चाहत्यांनी जाहिरातीला चांगलीच पसंती दिली आहे.
पाहा व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement