एक्स्प्लोर

Vikram Collection : कमल हासनच्या ‘विक्रम’चा जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! कमावले तब्बल ‘इतके’ कोटी...

Vikram Collection : सुपरस्टार कमल हासनचा (Kamal Haasan) 'विक्रम' (Vikram) बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाची कमाई सातत्याने वाढतच आहे.

Vikram Collection : सुपरस्टार कमल हासनचा (Kamal Haasan) 'विक्रम' (Vikram) बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाची कमाई सातत्याने वाढतच आहे. विक्रम हा कमल हासनच्या दीर्घ चित्रपट कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. रिलीज झाल्यापासून जबरदस्त कलेक्शन करणारा हा चित्रपट लवकरच 400 कोटी क्लबमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. लोकेश कनागराज दिग्दर्शित कमल हासन स्टारर विक्रम हा चित्रपट केवळ भारतातच नाही तर, जगभरात बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.

रिलीजच्या तिसऱ्या वीकेंडच्या अखेरीस विक्रमने जगभरात 400 कोटींच्या जवळपास कमाई केली आहे. देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ‘विक्रम’च्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या काही दिवसांत चित्रपटाच्या कमाईत तेजी पाहायला मिळत आहे. रिलीजच्या 25व्या दिवशीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

असाही ‘विक्रम’!

या चित्रपटाने केवळ तामिळनाडूमध्ये 150 कोटींची कमाई केली आहे. हा या चित्रपटाचा एक नवा विक्रम आहे. ‘विक्रम’ चित्रपटाच्या आधी एसएस राजामौली यांच्या 'बाहुबली 2' ने हा पराक्रम केला होता. मूलतः तेलुगूमध्ये बनलेल्या 'बाहुबली 2' ने राज्यात 146 कोटींची कमाई केली होती.

चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बाला यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले की, 'विक्रम' हा राज्यातील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 'विश्वसम' आणि 'बाहुबली 2'ला मागे टाकून 'विक्रम' लवकरच तामिळनाडूमध्ये सर्वाधिक कमाईचा आकडा पार करून पहिल्या क्रमांकावर पोहोचणार आहे.

बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई!

रिपोर्ट्सनुसार, 150 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 11 दिवसांत भारतातील सर्व भारतीय भाषांमध्ये 220.75 कोटींची कमाई केली आहे. त्याच वेळी, या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 350 कोटी रुपयांचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. ‘विक्रम’ हा चित्रपट जगभरात 3200 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला. ‘विक्रम’ हा लोकेश कनागराज दिग्दर्शित अॅक्शन ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटात विजय सेतुपती, फहाद फासिल, कमल हासन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अभिनेता सुर्याचा या चित्रपटात एक कॅमिओ देखील आहे, यात तो ‘रोलेक्स’ची भूमिका करताना दिसला होता.

हेही वाचा :

Vikram : पुष्पा नंतर आता विक्रमची क्रेझ; क्रिकेटर वॉशिंग्टन सुंदरकडून भन्नाट व्हिडीओ शेअर

Vikram box office day 10 collection : जगभरातील बॉक्स ऑफिसवर 'विक्रम'ची जादू

Vikram : विक्रमच्या यशानंतर सूर्याला कमल हसन यांनी दिलं 'रोलेक्स' घड्याळ; किंमत ऐकून व्हाल थक्क!

महत्त्वाच्या बातम्या

Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Singer Soraya Nieto: भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
Swati Deval on Abortions: 'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’
'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget