Vijay Sethupathi Birthday : सेल्समन ते अभिनेता, जाणून घ्या दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपतीचा प्रवास
Vijay Sethupathi Birthday : दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपतीचा आज वाढदिवस आहे. सेल्समन, कॅशिअरची नोकरी करणारा विजय सेतुपती आज सुपरस्टार आहे.
Vijay Sethupathi Birthday : टॉलिवूडचा सुपरस्टार, निर्माता, संवाद लेखक आणि गीतकार विजय सेतुपतीचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. विजय सेतुपतीने आतापर्यंत एका पेक्षा एक भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या सिनेमांची अगदी चातकासारखी वाट पाहिली जाते. विजय सेतुपती आज त्याचा 44 वा वाढदिवस साजरा करत आहे.
सुपरस्टार असलेल्या विजय सेतुपतीला अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नाही. विजयचा जन्म तामिळनाडूतील राजपालयम या गावातील अगदीच सामान्य परिवारात झाला. तो सहावीत शिकत असतानाच त्याच्या परिवाराने चेन्नईला स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. त्याने धनराज बेद महाविद्यालयातून पदवी पूर्ण केली. खूपच हालाखीच्या परिस्थितीत त्याने दिवस काढले.
पदवी घेतल्यानंतर उदरनिर्वाहासाठी विजयने एका रिटेल स्टोअरमध्ये सेल्समनची नोकरी सुरू केली. त्यानंतर एका फास्ट फूडच्या दुकानात कॅशिअरची नोकरीही केली. आपल्या तीन भावंडांची आणि परिवाराची आर्थिक गरज भागवण्यासाठी विजय सेतुपतीने दुबईला जायचा निर्णय घेतला. परंतु या नोकरीत मन न लागल्याने त्याने भारतात परतण्याचा निर्णय घेतला.
View this post on Instagram
विजय सेतुपतीने केवळ कॉमेडी ड्रामा अथवा थ्रिलर चित्रपटातच काम केलं नाही तर प्रेम कुमार निर्मित चित्रपट '96' मध्येही आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. विजय सेतुपती हा फक्त अभिनेताच नाही तर तो एक यशस्वी निर्मातादेखील आहे. आज विजयची गणना साऊथच्या सर्वात महागड्या आणि सर्वाधिक कमाई करणाऱ्या स्टार्समध्ये केली जाते.
असा मिळाला ब्रेक
दुबईवरुन परत आल्यानंतर विजयने चेन्नईचा एक थिएटर ग्रुप जॉईन केला. या ठिकाणी तो अभिनयासोबतच अकाउंटचे कामही करायचा. या थिएटर ग्रुपमध्ये काम करताना त्याने अभिनयातील बारीक पैलू शिकून घेतले. त्याला आता तामिळ चित्रपटात सपोर्टिंग अॅक्टरची भूमिका मिळू लागली. त्यानंतर विजय सेतुपतीने टीव्हीवरही काम करायला सुरुवात केली. पण त्याला सर्वात मोठा ब्रेक मिळाला तो रामासामीच्या Thenmerku Paruvakaatru या चित्रपटातून. विजय सेतुपतीने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आणि इथूनच विजय सेतुपतीच्या करिअरने वेग पकडला. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही.
संबंधित बातम्या
विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर अनुष्का शर्माची इमोशनल पोस्ट
Farhan Akhtar And Shibani Dandekar : फरहान अख्तरची गर्लफ्रेंड शिबानी दांडेकरने लग्नाआधीच काढला टॅटू
Pushpa 2 : या वर्षी येणार 'पुष्पा'चा सिक्वेल, चाहत्यांना प्रतिक्षा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha