एक्स्प्लोर
कंगनाची बाजू घेतल्याने विद्या बालनचे पतीशी खटके?

मुंबई : बॉलिवूडची वन वुमन आर्मी मानली जाणारी अभिनेत्री विद्या बालनने बॉलिवूडची आणखी एक सक्षम अभिनेत्री कंगना रनौतचं कौतुक केलं आहे. कंगना-हृतिकच्या या वादात विद्याने कंगनाची कड घेतल्यामुळे विद्याचे पती, निर्माते सिद्धार्थ रॉय कपूर मात्र नाराज झाल्याचं वृत्त होतं.
कंगना स्वतःच्या लढ्यात ठामपणे उभी राहिल्यामुळे कंगनाने तिची स्तुती केली होती. मात्र यूटीव्ही डिस्नीचे प्रमुख असलेल्या सिद्धार्थ रॉय कपूर यांची निर्मिती असलेला, हृतिकची मुख्य भूमिका अलेला 'काबील' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. कंगना आणि हृतिक कायदेशीर वादात अडकले असताना आपल्या पत्नीनेच कंगनाची बाजू उचलून धरणं त्यांना पसंत पडलं नसल्याचं म्हटलं जातं.
विद्या बालनने मात्र पती सिद्धार्थ यांच्यासोबत खटके उडाल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. 'तुम्ही म्हणताय आमच्यात भांडण झालं, मला तर याची काहीच माहिती नाही' असं विद्याने म्हटलं आहे.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement
























