Riteish Deshmukh video | 'माऊली'चं माऊली प्रेम, रितेश देखमुखने शेअर केला अनोखा व्हिडिओ
आईच्या जुन्या साड्यांपासून स्वत:साठी आणि मुलांसाठी बनवले लाखमोलाचे कुर्ते. रितेश देशमुशचा दिवाळीच्या शुभेच्छा देणारा हा व्हिडिओ चर्चेत आला आहे.
मुंबई: अभिनेता रितेश देशमुखचे सोशल मीडियावरचे व्हिडिओ त्याच्या चाहत्यांसाठी नेहमीच पर्वणी ठरतात. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रितेश देशमुखने एक व्हिडिओ शेअर केलाय. आईच्या जुन्या साडीपासून त्यांने स्वत:ला आणि त्याच्या दोन मुलांसाठी कुर्ता शिवला आहे आणि त्यावर आधारित एक अनोखा व्हिडिओ त्याने ट्विटरवर शेअर केला आहे.
आईची जुनी साडी, तिच्या मुलांसाठी दिवाळीचे नवे कपडे असे सांगत त्यांने त्याच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटरवर त्याने हा व्हिडिओ शेअर केला असून त्याची पत्नी जेनेलियाला त्यामध्ये टॅग करण्यात आले आहे. रितेशच्या या 19 सेकंदाच्या व्हिडिओत तो स्वत: त्याची दोन मुलं आणि आईसह दिसतोय. हा व्हिडिओ त्याची पत्नी जेनेलिया देशमुखने शूट केला आहे.
माँ की पुरानी साड़ी, बच्चों के लिए दिवाली के नए कपड़े। Happy Diwali .... shot by Baiko @geneliad - Song credit @sujoy_g #Recycle pic.twitter.com/hfSvLBXdjG
— Riteish Deshmukh (@Riteishd) November 14, 2020
'माँ की पुरानी साड़ी, बच्चों के लिए दिवाली के नए कपड़े।' असे सांगत दिवाळीच्या शुभेच्छांच्या या व्हिडिओला त्याच्या चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळतोय. या आधीही अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ रितेशच्या सोशल मीडियावर पहायला मिळतात. समृध्द वारसा आणि संस्कार जपणारं कुटुंब अशी ओळख देशमुख कुटुंबाची आहे.
महत्वाच्या बातम्या:
- रितेश देशमुखकडून भावुक व्हिडीओ शेअर करुन वडिलांच्या आठवणींना उजाळा
- मुख्यमंत्र्यांचे करावे तितके कौतुक कमीच, रितेश देशमुखकडून स्तुतिसुमनं
- 'शिवाजी... राजा शिवाजी... छत्रपती शिवाजी'; नागराज-रितेश रुपेरी पडद्यावर साकारणार 'शिवत्रयी'
- 'तुझे मेरी कसम' चित्रपटाला 17 वर्ष पूर्ण, रितेश-जेनेलियाची बाभळगावातून टिकटॉकवर धूम