Vicky Kaushal-Katrina Kaif Marriage : कतरिना आणि विकी हनीमूनवरून उद्या परतणार मुंबईला
Vicky Kaushal-Katrina Kaif Marriage : कतरिना कैफ आणि विकी कौशल मालदीवमधील हनीमूनवरून उद्या दुपारी मुंबईला परतणार आहेत.
Vicky Kaushal-Katrina Kaif Marriage : कतरिना कैफ आणि विकी कौशल नुकतेच विवाहबंधनात अडकले. राजस्थानच्या बरवारा येथील सिक्स सेन्सेस फोर्टमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. त्यानंतर ते हनीमूनसाठी मालदीवला रवाना झाले. आता विकी आणि कतरिना मालदीवमधील हनीमूनवरून उद्या दुपारी मुंबईला परतणार आहेत.
कतरिना आणि विकी उद्या दुपारी दोन नंतर मुंबईतील कलिना विमानतळावर चार्टर्ड विमानाने उतरतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे दोघेही एकत्र मुंबईहून चार्टर्ड विमानाने 6 डिसेंबर रोजी जयपूरला रवाना झाले होते. आणि आता दोघेही चार्टर्ड विमानाद्वारे एकत्र मुंबईला परतणार आहेत.
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी 9 डिसेंबर रोजी राजस्थानमधील रॉयल सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथे सात फेरे घेतले. मेहंदी, हळदी, संगीत, लग्न अशा सर्व समारंभांना कतरिना आणि विकीच्या जवळच्या नातेवाईकांनी हजेरी लावली होती. पण दोघांच्या या शाही विवाह सोहळ्यात एकाही बॉलिवूड सेलिब्रिटीची उपस्थिती नव्हती.
कोरोनामुळे दोघांनीही अगदी जवळच्या लोकांना लग्न समारंभासाठी आमंत्रित केले होते. पण आता दोघेही बॉलीवूडमधील त्यांच्या सर्व मित्रांसाठी एक भव्य रिसेप्शन आयोजित करतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.
View this post on Instagram
9 डिसेंबरला लग्न झाल्यानंतर कतरिना आणि विकी 10 डिसेंबरला सकाळी हेलिकॉप्टरने जयपूर विमानतळावर पोहोचले. तेथून मुंबई विमानतळावर इंधन घेण्यासाठी दोघांचे चार्टर्ड विमान काही काळ थांबले. यानंतर दोघेही एकाच चार्टर्ड विमानातून मालदीवमधील आलिशान रिसॉर्टमध्ये हनिमूनसाठी रवाना झाले.
संबंधित बातम्या
Vicky Kaushal-Katrina Kaif Marriage : कतरिना-विकीवर शुभेच्छांचा वर्षाव; बॉलिवूड कलाकारांच्या हटके कमेंट्स, करिनाची पोस्ट चर्चेत
Vicky Kaushal-Katrina Kaif Marriage : विकी- कतरिना असणार विरूष्काचे शेजारी ; अनुष्का म्हणाली, 'आता आम्हाला...'
Katrina-Vicky Wedding Pics : कतरिना कैफ-विकी कौशलचा असाही विक्रम; लग्नाच्या फोटोंना केवळ 20 मिनीटात 10 लाख लाईक्स
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha