Bala Murugan Passes Away: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध लेखक बाला मुरुगन यांचे निधन; वयाच्या 86 वर्षी घेतला अखेरचा श्वास
वयाच्या 86 वर्षी बाला मुरुगन (Bala murugan) यांनी अखेरचा श्वास घेतला. बाला मुरुगन यांनी अनेक हिट तमिळ आणि तेलूगू चित्रपटांच्या कथा लिहिल्या.
Bala Murugan Passes Away: लोकप्रिय तमिळ आणि तेलूगू चित्रपटांचे लेखक बाला मुरुगन (Bala murugan) यांचे आज निधन झाले. बाला मुरुगन यांनी अनेक हिट तमिळ आणि तेलूगू चित्रपटांच्या कथा लिहिल्या. वयाच्या 86 वर्षी बाला मुरुगन यांनी अखेरचा श्वास घेतला. बाला मुरुगन यांचा मुलगा, भूपती राजा याने बाला मुरुगन यांच्या निधनाची बातमी दिली. आज सकाळी 8:45 वाजता बाला मुरुगन यांचे निधन झाले. ते गेल्या काही वर्षांपासून आजारांनी त्रस्त होते.
अनेक तेलूगू चित्रपटांच्या कथा बाला मुरुगन यांनी लिहिल्या. धर्मदाथा, अलुमगालू, सोग्गडू,सावसगल्लू आणि जीवन तरंगलू या चित्रपटांच्या कथा बाला मुरुगन यांनी लिहिल्या. शिवाजी गणेशन यांच्या 30 ते 40 चित्रपटांच्या कथांचे लेखन बाला मुरुगन यांनी केलं आहे. गीता आर्ट्सचा ‘बंत्रोतु भर्या’ या पहिला चित्रपटाच्या कथालेखनात देखील त्यांनी योगदान दिले. त्यांनी शोभन बाबू अभिनीत ‘सोग्गाडू’ या चित्रपटाच्या कथेचे देखील लेखन केले होते. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. बाला मुरुगन यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
अभिनेता कायल देवराज यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन बाला मुरुगन यांना श्रद्धांजली वाहिली आहे. कायल देवराज यांनी बाला मुरुगन यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला.
Writer #Balamurugan (85) passed away at his residence in R A Puram yesterday. He was the writer for famous films like #Anbukkarangal#EngaIoruRaja#RamanEtthanaiRamanady #PattikadaPattanama#VasanthaMaligai etc
— Actor Kayal Devaraj (@kayaldevaraj) January 15, 2023
May his soul rest in peace ✨🌸 pic.twitter.com/DpL7HAVozZ
बाला मुरुगन यांचा मुलगा भूपती राजा याने बालपणी राजापार्ट रेंगादुराई, इंगल थांगा राजा, मनिक्का थोटील आणि थंगापथक्कम यासारख्या काही चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी शिवाजी गणेशन यांच्यासोबत वयाच्या 8 व्या वर्षी बालकलाकार म्हणूनही काम केले. त्यांचा पहिला चित्रपट- ‘राजा राजा थान’ हा होता. या चित्रपटची निर्मिती प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर मिस्टर निवाझ यांनी केली. तर रामराजन आणि गौथामी यांनी त्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: