एक्स्प्लोर

'अशा लहानसहान गोष्टी होतच असतात..' दिग्गज बॉलिवूड अभिनेत्रीची ए. आर. रहमान यांच्या सांप्रदायिक वक्तव्यावर प्रतिक्रिया. स्पष्टच म्हणाल्या..

या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला असून काहींनी त्याला पाठिंबा दिला, तर काहींनी त्यावर आक्षेप नोंदवला.

AR Rehman: संगीतकार ए. आर. रहमान यांनी बॉलीवूडमधील कथित सांप्रदायिक भेदभावाबाबत केलेल्या वक्तव्यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांच्या या विधानानंतर मनोरंजन अनेक प्रतिक्रिया उमटत असताना आता ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रहमान यांनीही यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कामामध्ये चढ-उतार येतच असतात, यात काही वेगळं नाही, असं त्या म्हणाल्या आहेत. ए. आर. रहमान यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मागील काही वर्षांपासून आपल्याला काम कमी मिळत असल्याचं सांगितलं होतं. यामागे इंडस्ट्रीतील ‘सांप्रदायिक पूर्वग्रह’ कारणीभूत असू शकतो, असा सूचक उल्लेख त्यांनी केला होता. या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला असून काहींनी त्याला पाठिंबा दिला, तर काहींनी त्यावर आक्षेप नोंदवला. या पार्श्वभूमीवर वहीदा रहमान यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

काय म्हणाल्या वहीदा रहमान?

इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत ए. आर. रहमान यांच्या वक्तव्यावर विचारलं असता वहीदा रहमान म्हणाल्या, “हो, मी याबद्दल वाचलं आहे. पण मला या विषयाच्या खोलात जायचं नाही. सगळं ठीक चालू असताना अशा गोष्टींवर जास्त लक्ष देणं मला गरजेचं वाटत नाही. प्रत्येक देशात अशा लहानसहान गोष्टी होतच असतात.”

त्या पुढे म्हणाल्या, “कुणावर किती विश्वास ठेवायचा, हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. हे खरं आहे की नाही, यामध्ये आपण का गुंतायचं? किमान माझ्या या वयात मला कोणत्याही वादात पडायचं नाही. शांततेत रहा. हा आपला देश आहे. आनंदी रहा. मी एवढंच सांगू शकते.”

‘कामात चढ-उतार असतात’

वहीदा रहमान यांनी यावेळी कामाबाबतही मत व्यक्त केलं. “कदाचित रहमान यांना अपेक्षेइतकं काम मिळत नसेल, म्हणून त्यांनी असं वक्तव्य केलं असेल. कामात चढ-उतार येतच असतात. एका विशिष्ट वयानंतर लोक नव्या किंवा वेगळ्या लोकांना संधी देण्याचा विचार करतात. काही जण या प्रक्रियेत मागे पडतात. एखादी व्यक्ती एकदा शिखरावर पोहोचली म्हणून ती कायम तिथेच राहील, असं होत नाही,” असंही त्या म्हणाल्या.

ए. आर. रहमान यांनी नेमकं काय म्हटलं होतं?

बीबीसी एशियन नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत ए. आर. रहमान यांनी म्हटलं होतं की, मागील काही वर्षांत बॉलीवूडमध्ये निर्णय घेण्याची सत्ता कमी क्रिएटिव लोकांकडे गेली आहे. “गेल्या 8 वर्षांत सत्तेत बदल झाला असावा. जे फारसे क्रिएटिव नाहीत, तेच निर्णय घेत आहेत. कदाचित सांप्रदायिक बाबीही असतील, पण कोणी माझ्या समोर उघडपणे काही सांगितलेलं नाही. मात्र काही कुजबुज ऐकू येते,” असं रहमान यांनी म्हटलं होतं. याच वक्तव्यामुळे सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Jayanti 2 Marathi Movie: 'जयंती' नंतर आता येतोय 'जयंती 2'; सीक्वेलमध्ये नवा चेहरा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीची एन्ट्री
'जयंती' नंतर आता येतोय 'जयंती 2'; सीक्वेलमध्ये नवा चेहरा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीची एन्ट्री
Nauheed Cyrusi on Miscarriages: 'मौला मेरे मौला' फेम अभिनेत्री का आई होऊ शकली नाही? म्हणाली, 2 वेळा गर्भपात; तिसऱ्या महिन्यांतच बाळाच्या हृदयाचे ठोके....
'मौला मेरे मौला' फेम अभिनेत्री का आई होऊ शकली नाही? म्हणाली, 2 वेळा गर्भपात; तिसऱ्या महिन्यांतच बाळाच्या हृदयाचे ठोके....
Devoleena Bhattacharjee: पुराच्या पाण्यात अडकली आई, आजी-मावशीचं घर बुडालं; निसर्गाचा विध्वंस पाहून प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला रडू कोसळलं
पुराच्या पाण्यात अडकली आई, आजी-मावशीचं घर बुडालं; निसर्गाचा विध्वंस पाहून प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला रडू कोसळलं
Urmila Matondkar Ram Gopal Varma Married Claim Jyoti Venkatesh: उर्मिला मातोंडकर, राम गोपाल वर्मा यांनी गुपचूप उरकलेलं लग्न? साऊथच्या मेगास्टारनं केलेला भांडाफोड, धक्कादायक गौप्यस्फोटानं खळबळ
उर्मिला मातोंडकर, राम गोपाल वर्मा यांनी गुपचूप उरकलेलं लग्न? साऊथच्या मेगास्टारनं केलेला भांडाफोड, धक्कादायक गौप्यस्फोटानं खळबळ

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
Thane Accident News : रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
Pimpri Chinchwad Crime: पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
Tukaram Mundhe Marathi News: तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
दोन दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, तुम्ही ओबीसींवर अन्याय करता? विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल, सरकारला हल्लाबोल
दोन दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, तुम्ही ओबीसींवर अन्याय करता? विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल, सरकारला हल्लाबोल
कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
Embed widget