एक्स्प्लोर

उत्तम नट तर गेलाच, पण जवळचा मित्र गमावला: अशोक सराफ

विजय चव्हाण यांचं निधन: एक जवळचा मित्र गमावल्याची भावना ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केली. ते एबीपी माझाशी बोलत होते.

विजय चव्हाण यांचं निधन मुंबई: ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. ते 63 वर्षांचे होते. मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विजय चव्हाण यांच्या जाण्याने वैयक्तिक नुकसान आणि एक जवळचा मित्र गमावल्याची भावना ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केली. ते एबीपी माझाशी बोलत होते. अशोक सराफ यांची प्रतिक्रिया "विजय चव्हाण यांच्या जाण्याने खरोखरच एक पोकळी निर्माण झाली आहे. एक हरहुन्नरी नट, कुठल्याही भूमिकेत चपखल बसणारा असा विजय होता. ‘मोरुची मावशी’ या नाटकातील मावशीची भूमिका अजरामर आहे. एक नट तर गेलेला आहेच पण एक जवळचा मित्र गेला याचं दु:ख अधिक आहे. आम्ही बऱ्याच चित्रपटात कामं केली. प्रत्येकवेळी त्याने स्वत:ची छाप सोडली. चांगला मित्र गेला याचं जास्त दु:ख आहे. विजयने शून्यातून करिअर सुरु केलं. काही जणांना निसर्गदत्त असतं, काहींना स्वत:ला कर्तृत्त्वाने निर्माण करावं लागतं. मावशीच्या रोलने त्याने फार काही मिळवलं. त्याने स्वत:च्या कर्तृत्त्वाने मिळवलं. विजयची शैली वेगळी होती. त्याने स्वत:ची स्टाईल निर्माण केली होती. त्यामुळे ती इंडस्ट्रीच्या दृष्टीने महत्त्वाची होती", अशी भावना अशोक सराफ यांनी व्यक्त केली. वाचा - 'मोरुची मावशी' विजय चव्हाण यांची कारकीर्द  अभिनेते विजय चव्हाण यांचं निधन ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. फुफ्फुसाच्या आजारामुळे फोर्टिस रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. ते 63 वर्षांचे होते.  विजय चव्हाण यांच्या रुपाने मराठी चित्रपट, नाटक आणि मालिका या तिन्ही माध्यमांना गेली 40 वर्षे व्यापून टाकणारा अष्टपैलू अभिनेता महाराष्ट्राच्या कलाविश्वाने गमावला आहे. विजय चव्हाण यांचं बालपण मुंबईतील करीरोडच्या गिरणगाव भागात गेले. शालेय शिक्षण दादरच्या इंग्लिश स्कूलमध्ये झालं. त्यानंतर रुपारेल कॉलेजमधून त्यांनी बीएची पदवी घेतली. रंगभूमी, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये लीलया वावरणारा अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला.

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
Prakash Raj on SIR: अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
Embed widget