Ved : रितेश-जिनिलियाचा 'वेड' बॉक्स ऑफिसवर सुसाट! चाहत्यांचे आभार मानत रितेश म्हणाला...
Ved : रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुखच्या 'वेड' या सिनेमाने आता तिसऱ्या आठवड्यात प्रवेश केला आहे.
![Ved : रितेश-जिनिलियाचा 'वेड' बॉक्स ऑफिसवर सुसाट! चाहत्यांचे आभार मानत रितेश म्हणाला... Ved Riteish Deshmukh Genelia Deshmukh marathi movie Ved is a success at the box office know ved box office collection Thanking the fans Riteish said Ved : रितेश-जिनिलियाचा 'वेड' बॉक्स ऑफिसवर सुसाट! चाहत्यांचे आभार मानत रितेश म्हणाला...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/0b2f0f352d9d6917871a2282aa99c27f1673681211410254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Riteish Deshmukh Genelia Deshmukh Ved Movie Box Office Collection : अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुखचा (Genelia Deshmukh) 'वेड' (Ved) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात मिळालेल्या घवघवीत यशानंतर या सिनेमाने आता तिसऱ्या आठवड्यात प्रवेश केला आहे.
'वेड' बॉक्स ऑफिस कलेक्शन... (Ved Box Office Collection)
'वेड' (Ved Movie) या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 20.67 कोटी आणि दुसऱ्या आठवड्यात 20.18 कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत या सिनेमाने 40.85 कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरतो आहे.
रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) 'वेड' या सिनेमाचं पोस्टर शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. रितेशने शेअर केलेल्या फोटोवर रितेश आणि जिनिलियाचा (Genelia Dsouza) फोटो दिसत असून या पोस्टरवर 'ब्लॉकबस्टर' असे लिहिण्यात आले आहे.
View this post on Instagram
'वेड' या सिनेमाचं पोस्टर शेअर करत रितेशने लिहिलं आहे,"वेड' हा सिनेमा आता ब्लॉकबस्टर ठरला आहे. तुमच्या अपार प्रेम आणि कौतुकाबद्दल आभार". रितेशच्या पोस्टवर 'मराठीतले सुपरस्टार, भाऊ तुम्ही मराठीतच सिनेमा बनवत जा, 'वेड' हिंदीत कधी येणर?, दादा वहिनी खूप खूप अभिनंदन, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
'वेड' मोडणार सैराटचा 100 कोटीचा रेकॉर्ड
'वेड' (Ved) या सिनेमाची बॉक्स ऑफिसवरील घौडदौड पाहता हा सिनेमा नागराज मंजुळेच्या 'सैराट' (Sairat) या सिनेमाचा रेकॉर्ड मोडणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. सैराटप्रमाणे 'वेड' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांची पाऊले पुन्हा पुन्हा सिनेमागृहाकडे वळत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)