(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ved : रितेश-जिनिलियाची बॉक्स ऑफिसवरील जादू संपेना; कोरोनानंतर सर्वाधिक कमाई करणारा मराठी सिनेमा ठरला 'वेड'
Ved Movie : रितेश-जिनिलियाचा 'वेड' हा सिनेमा कोरोनानंतर सर्वाधिक कमाई करणारा मराठी सिनेमा ठरला आहे.
Riteish Deshmukh Genelia Deshmukh Ved Movie Box Office Collection : हिंदी सिनेसृष्टीत धुमाकूळ घातल्यानंतर रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुखने (Genelia Deshmukh) मराठी सिनेसृष्टीतदेखील चांगलाच धमाका केला आहे. रितेश आणि जिनिलियाचा 'वेड' (Ved) हा सिनेमा सिनेप्रेमींच्या पसंतीस उतरत आहे. कोरोनानंतर सर्वाधिक कमाई करणारा मराठी सिनेमा 'वेड' (Ved Movie) ठरला आहे.
रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलियाचा (Genelia Dsouza) मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्या सिनेमांची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. आता 'वेड' (Ved) या सिनेमाच्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. सिनेमा प्रदर्शित होऊन आता पंधरा दिवस झाले असले तरी बॉक्स ऑफिसवर त्यांची जादू कायम आहे.
'वेड' बॉक्स ऑफिस कलेक्शन (Ved Box Office Collection)
'वेड' हा सिनेमा 30 डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. दिवसेंदिवस हा सिनेमा रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. कोरोनानंतर सर्वाधिक कमाई करणारा मराठी सिनेमा 'वेड' ठरला असला आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत हा सिनेमा दुसऱ्या स्थानावर आहे. लवकरच हा सिनेमा नागराज मंजुळेच्या सैराटचा रेकॉर्ड मोडू शकतो आणि सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत पहिल्या स्थानावर येऊ शकतो.
'वेड' या सिनेमाने आतापर्यंत 44.92 कोटींची कमाई केली आहे. लवकरच हा सिनेमा 50 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. या सिनेमातील कलाकार, त्यांचा अभिनय, संवाद आणि गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. काही प्रेक्षक पुन्हा पुन्हा सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा पाहत आहेत.
View this post on Instagram
प्रेक्षकांची पाऊले सिनेमागृहाकडे वळवण्यात 'वेड' यशस्वी! (Ved Movie Success)
'वेड' (Ved) या सिनेमाच्या माध्यमातून जिनिलियाने मराठी सिनेविश्वात पाऊल ठेवलं आहे. या सिनेमात मुख्य भूमिकेत असण्यासोबत ती या सिनेमाची निर्मातीदेखील आहे. तसेच लाडक्या रितेश भाऊने या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. या सिनेमाने बॉलिवूडच्या बिग बजेट सिनेमांना मागे टाकलं असून कोरोनानंतर प्रेक्षकांची पाऊले पुन्हा एकदा सिनेमागृहाकडे वळवली आहेत.
संबंधित बातम्या