आईला हॉस्पिटलमध्ये भेटायला गेली, पण डोळ्यावरचा गॉगल पाहून चाहते भडकले, उर्वशी रौटेला तुफान ट्रोल!
Urvashi Rautela Photo : उर्वशी रौतेलाला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं आहे. तिने अपलोड केलेल्या फोटोवरून तिला हे ट्रोल केलं जातं आहे.
Urvashi Rautela : उर्वशी रौतेलाने अत्यंत कमी काळात बॉलिवुडमध्ये स्वत:ची जागा निर्माण केली. तिचे संपूर्ण देशभरात कोट्यवधी चाहते आहेत. तिचा नुकताच डाकू महाराज हा चित्रपट प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच चालला. दरम्यान, ही अभिनेत्री वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत येते. अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात तिने केलेल्या विधानामुळे ती वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. असे असाताना आता तिला पुन्हा एकदा ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे.
आईचा रुग्णालयातील फोटो केला अपलोड
उर्वशी रौतेला ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. तिच्या आयुष्यात नेमकं काय चालू आहे, हे ती नेहमीच इन्स्टाग्राम तसेच इतर समाजमाध्यातून तिच्या चाहत्यांना सांगत असते. उर्वशीची आई मीरा रौतेला यांना नुकतेच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना रुग्णालयात का दाखल करण्यात आलं आहे, हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र याच कारणामुळे उर्वशी रौतेलाला सध्या ट्रोल केलं जात आहे. तिने आपल्या आईचा रुग्णालयातील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. याच फोटोमुळे तिचे चाहते तिच्यावर भडकले आहेत.
उर्वशी रौतेलाने नेमकं काय केलंय?
उर्वशी रौतेलाने इन्स्टाग्रावर तिच्या आईचा रुग्णालयातील फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये उर्वशीची आई बेडवर झोपलेली दिसत आहे. तिच्यावर उपचार चालू आहेत. तर दुसरीकडे उर्वशी डोळ्यांवर गॉगल घालून तिच्या आईच्या गळ्यात पडली आहे. सोबतच तिने माझ्या आईसाठी प्रार्थना करा, असे कॅप्शन तिने दिले आहे. या फोटोला पाहुन नेटकरी तसेच तिचे चाहते तिला ट्रोल करत आहेत. आईला भेटायला गेली आहे, मग रुग्णालयात डोळ्यावर गॉगल ठेवण्याची गरज काय होती? असं नेटकरी तिला विचारत आहेत. एका नेटकऱ्याने 'ते सर्व ठीक आहे, पण डोळ्यावरचा गॉगल काढायला हवा होता' अशी कमेंट केली आहे. तर 'रुग्णालयात जाणारी पहिली अभिनेत्री' असे उपरोधिक भाष्य केले आहे.
View this post on Instagram
हातातील रेलेक्स घड्याळ दाखवल्यामुळे ट्रोल
दरम्यान, याआधीही सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात उर्वशी रौतेलाने केलेल्या टिप्पणीमुळे तिला ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते. सैफ अली खानवर झालेल्या चाकूहल्ल्यावर बोलताना तिने हात वर करत महागडं रोलेक्स घड्याळ दाखवलं होतं. तसेच हातातील अंगठीही दाखवत मला हे माझ्या आईकडून गिफ्ट मिळालं असल्याचं सांगितलं होतं. यामुळेच तिला टीकेला सामोरे जावेल लागले होते. सैफ अली खानवर झालेला हल्ला हा संवेदनशील विषय आहे. या प्रकरणावर बोलताना मिळालेल्या गिफ्टवर बोलणं गरजेचं नव्हतं, असं म्हणत तिच्यावर टीका झाली होती. नंतर उर्वशीने या प्रकरणी इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून माफीदेखील मागितली होती. मात्र ही स्टोरी तिने लगेच डिलीटही केली होती.
हेही वाचा :