Urvashi Rautela : वर्ल्डकपच्या महामुकाबल्यासाठी उर्वशी रौतेला उत्सुक; म्हणाली,"भारतच ट्रॉफी जिंकेल"
Urvashi Rautela : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यासाठी अभिनेत्री उर्वशी रौतेला उत्साहित आहे. तसेच भारतच ट्रॉफी जिंकेल असं अभिनेत्री म्हणाली आहे.
Urvashi Rautela : अहमदाबादच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा (India Vs Australia) अंतिम सामना रंगणार आहे. विश्वचषकाचा हा सामना पाहायला विविध क्षेत्रातील अनेक मंडळी उपस्थित राहणार आहेत. राजकीय मंडळींसह बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील हजेरी लावणार आहेत. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यासाठी अभिनेत्री उर्वशी रौतेलादेखील (Urvashi Rautela) हजेरी लावणार आहे. या सामन्यासाठी अभिनेत्री उत्साहित असून भारतच ट्रॉफी जिंकेल असा विश्वास तिने व्यक्त केला आहे.
संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेल्या क्रिकेट वर्ल्डकपचा महामुकाबला आज होणार आहे. एकीकडे मैदानात भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात कडवी झुंज रंगत असताना स्टेडियमवर अनेक सेलिब्रिटी उपस्थित असणार आहे. अभिनेत्री उर्वशी रौतेलाही भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याचा आनंद घेण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमवर पोहचणार आहे. या सामन्यासाठी अभिनेत्री खूपच उत्साहित आहे. सामन्याआधी मीडियासोबत बोलताना अभिनेत्री म्हणाली,"भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यासाठी मी खूप उत्साहित आहे. मला खात्री आहे की भारतच ट्रॉफी जिंकेल".
#WATCH | Gujarat: Ahead of the ICC World Cup final between India and Australia, actress Urvashi Rautela says, "I am very excited. I am sure India will win the trophy..." pic.twitter.com/6jZf1VRpbr
— ANI (@ANI) November 19, 2023
Ind Vs Pak मॅच पाहणं उर्वशीला पडलेलं महागात
उर्वशी रौतेला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचा आनंद घेण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पोहोचली होती. त्यानंतर यावेळी अभिनेत्रीचा 24 कॅरेट सोन्याच्या आयफोनवर चोरट्यांनी डल्ला मारला. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान सामना पाहणं उर्वशीला महागात पडलं होतं. फोन चोरी झाल्यानंतर अभिनेत्री एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली होती.
View this post on Instagram
उर्वशीच्या सिनेमांबद्दल जाणून घ्या... (Urvashi Rautela Movies)
उर्वशीने 2013 मध्ये आलेल्या 'सिंग साब द ग्रेट' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने 'सनम रे', 'ग्रेट गँड मस्ती', 'हेट स्टेरी 4' आणि 'पागलपंती' अशा अनेक सिनेमांमध्ये काम केलं. उर्वशीच्या आगामी सिनेमांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. उर्वशी ही सोशल मीडियावर अॅक्टिव असते. तिच्या आगामी चित्रपटांची माहिती ती सोशल मीडियावर माध्यमातून देते. तिला इन्स्टाग्रामवर 67.1 मिलियन फॉलोवर्स आहेत. वॉलटेर वीरय्या या चित्रपटातील बॉस पार्टी या आयटम साँगमधील उर्वशीच्या डान्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.
संबंधित बातम्या