वैवाहिक जीवनात थोडी वादळे निर्माण होण्याची शक्यता, हुकूमशाही वृत्तीमुळे घरातले लोक त्रस्त होतील.
वाहने जपून चालवावीत, महिला संतती बाबत समाधानी राहतील.
तुमच्यातील निर्मिती क्षमतेला वाव देणारे ग्रहमान आहे.
तुम्ही अजून ठेवलेल्या अनेक कामांना मूर्त स्वरूप येईल.
भागीदारीतील धंदा असेल, तर तेथे थोड्या कारणावरून वाद संभवतात.
काही गोष्टी न संतापता, सबुरीने घ्यायला लागतील. आर्थिक स्थिती सुधारेल.
आज खर्च जास्त होईल, प्रवासाचे योग येतील.
विद्यार्थ्यांनी अभ्यासातून आपले लक्ष विचलित होऊ देऊ नये. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ माना.
आज थोडी मानसिक अस्वस्थता जाणवली, तरी काही फायद्याच्या घटना पण घडतील.
तुमच्या बौद्धिक क्षमतेला वाव देणारे ग्रहमान आहे, तुमच्या स्वभावातील गुण जवळचे लोक हेरतील.
तुमचे कौतुक झाल्यामुळे थोडे सुखावून जाईल, कुटुंबातील लोक तुम्हाला पर धार्जिणी म्हणतील.
आज इतरांसाठी खूप काम कराल, मित्र-मैत्रिणींच्या समूहात रमून जाल.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.